प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेल्या घरांबाबत, पनवेल महापालिकेच्या कराबाबत नगर विकास मंत्री आठवड्याभरात निर्णय घेणार
महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील नेत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नवी मुंबईतील विविध विषयांवर चर्चाही केली. त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे तसेच पनवेल महानगरपालिकेचा अवाजवी कर याबाबत चर्चा केली.
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतील नेत्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नवी मुंबईतील विविध विषयांवर चर्चाही केली. त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे तसेच पनवेल महानगरपालिकेचा अवाजवी कर याबाबत चर्चा केली.
मंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच प्रकल्पग्रस्त बांधवांची गरजेपोटी असलेली घर कायम करण्यासंदर्भात तसेच पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता करा संदर्भात नेत्यांशी चर्चा केली. यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार आणि दि. बा.पाटील प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष बबनदादा पाटील, शेकापक्षाचे नेते आणि आमदार बाळाराम पाटील, महाडचे आमदार भरतशेठ गोगावले, माजी आमदार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरिष घरत, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव प्रशांत पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत हे सर्व या बैठकीला उपस्थित होते.
यावेळी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे तसेच पनवेल महानगरपालिकेचा अवाजवी कर याबाबत आपण याच आठवड्यात एक बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले.
नगर विकास मंत्र्यांच्या या आश्वासनामुळे गेले कित्येक वर्ष खितपत पडलेला प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न आता निकालात निघण्याची आशा बळावली आहे. त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनाही दिलासा मिळण्याचे संकेत मिळत आहेत.
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांच्या नावासाठी कृती समितीने गाठली दिल्लीhttps://t.co/aQ0ABC7mWs#navimumbai #NaviMumbaiAirport #DiBaPatil
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 14, 2021
संबंधित बातम्या :
भर पावसातही नवी मुंबईत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, स्वच्छतेवर भर देण्याचा संकल्प
कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी तयारीला गती द्या, नवी मुंबई आयुक्तांचे निर्देश