भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण, मुंबई बाजार समितीकडे ग्राहकांची पाठ, हे पहिल्यांदाचं घडतंय, व्यापाऱ्यांचं मत

श्रावण महिन्याच्या पाहिल्याच शनिवारी मुंबई एपीएमसी भाजीपाला बाजारात भाज्यां दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. याबाबत व्यापाऱ्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे. तर गेल्या अनेक वर्षांमधील हा पहिला श्रावण मास आहे, ज्यात भाज्यांच्या दरात प्रचंड घसरण झाली असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण, मुंबई बाजार समितीकडे ग्राहकांची पाठ, हे पहिल्यांदाचं घडतंय, व्यापाऱ्यांचं मत
बाजार समिती
Follow us
| Updated on: Aug 14, 2021 | 6:13 PM

नवी मुंबई: श्रावण महिन्याच्या पाहिल्याच शनिवारी मुंबई एपीएमसी भाजीपाला बाजारात भाज्यां दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. याबाबत व्यापाऱ्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे. तर गेल्या अनेक वर्षांमधील हा पहिला श्रावण मास आहे, ज्यात भाज्यांच्या दरात प्रचंड घसरण झाली असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

श्रावणाच्या पहिल्याच सोमवारी किरकोळ विक्रेत्यांनी भाजी खरेदी साठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे काहीअंशी बाजारभाव सुद्धा वाढले होते. शिवाय श्रावण महिन्यात भाजीपाल्याला चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना होती. मात्र, या श्रावणात काही वेगळीच स्थिती पाहायला मिळत आहे. श्रावण मासात मोठ्या प्रमाणात शाकाहार घेतला जातो. त्यामुळे भाजीपाला आणि फळांना मागणी वाढून भाज्यांत दरात वाढ होत असते, मात्र यावेळी तसं घडलेलं नाही.

मुंबई एपीएमसी भाजीपाला बाजारात आज 620 गाड्यांची आवक झाली. आज बाजाारत सर्वच प्रकारच्या भाजीपाल्याची आवक झाली होती. आठवड्याचा शेवटचा दिवस असताना पुरेसे ग्राहक बाजारात न आल्याने कवडीमोल भावाने आज भाजीपाला विकावा लागला. जवळपास सर्वच भाज्यांचे दर 10 रुपये प्रतीकिलोच्या खाली आले आहेत.

एपीएमसी भाजीपाला मार्केटमधील सध्यस्थितीत भाजीपाला दर

टोमॉटो 8 रुपये, काकडी 8 ते 10 रुपये , भेंडी 4 ते 8 रुपये, दुधी 8 ते 10 रुपये, वांगी 10 रुपये, फ्लॉवर 6 रुपये, कोबी 6 रुपये, कारली 12 रुपये, मेथी जुडी 15 रुपये, कोथांबीर जुडी 10 रुपये इतका भाव मिळाला आहे.

पुण्यातील जुन्नरमध्ये कांद्याला 20 रुपयांचा दर

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील कांदा उपबाजारात आज 13 हजार 340 कांदा पिशव्यांची आवक झाली. प्रतवारी होऊन एक नंबर कांद्यास 10 किलोस 200 रूपये बाजारभाव मिळाला. तसेच दोन कांद्यास दहा किलोस 150 ते 180 बाजारभाव मिळाला.तर गोल्टा काद्यास 80 ते 150 इतका बाजारभाव मिळाला. आवक जरी वाढत असली तरी बाजारभाव थोडीफार सुध्दा भाव वाढ झालेली दिसुन येत नाही.त्यामुळे कांद्याचे बाजारभाव सध्यातरी स्थीर राहणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा येथील कांदा उपबाजारात आज 13 हजार 340 कांदा पिशव्यांची आवक झाली. कांदा बाजारसमितीमध्ये दाखल झाल्यानंतर त्याची प्रतवारी करण्यात आली. प्रतवारी होऊन एक नंबर कांद्यास 10 किलोला 200 रूपये बाजारभाव मिळाला. म्हणजेच शेतकऱ्यांना एका किलोला 20 रुपयांचा दर मिळाला. एक नंबरच्या कांद्याला 20 रुपयेचा दर मिळाला तर दोन नंबरच्या कांद्यास दहा किलोस 150 ते 180 बाजारभाव मिळाला. तर, गोल्टा कांद्यास 80 ते 150 इतका बाजारभाव मिळाला. आवक जरी वाढत असली तरी बाजारभाव थोडीफार सुध्दा भाव वाढ झालेली दिसून येत नाही.त्यामुळे कांद्याचे बाजारभाव सध्यातरी स्थिर राहणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.

इतर बातम्या:

नंदुरबारमध्ये पावसाची दांडी, शेतकरी संकटात; प्रशासन ॲक्शन मोडवर, रोहयोतून रोजगार देण्याचा निर्णय

Onion Price Today: जुन्नरच्या बाजारसमितीत 13 हजार बॅगा कांद्याची आवक, कांद्याचा आजचा दर किती?

Vegetables rates down in Mumbai Apmc during first time in Shravan Month said by Traders

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.