पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भलेभले गार झाले. राज्य, जिल्हा, तालुक्यातल्या दिग्गज मंडळींना पराभव पत्करावा लागला. मात्र सध्या काँग्रेस नवचैतन्य निर्माण करण्याच्या तयारीत आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना राज्याचे नवनिर्वाचित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या एक हाती सत्ता काबीज करण्याच्या तयारीत आहेत. पनवेल मध्ये 2024 ला काँग्रेसचा आमदार निवडून येईल असा विश्वास देखील त्यांनी बोलून दाखवला होता.
नुकताच दोन दिवस आधी नाना पटोले यांचा दौरा हा महत्त्वपूर्ण ठरणार का? रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे अनेक निष्ठावान कार्यकर्ते सक्रिय आहेत मात्र कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मरगळ आली आहे ही तितकच खरं. हाच मार्ग दूर सारण्याचा प्रयत्न नाना पटोले यांच्या माध्यमातून होत आहे.
महाडचे माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव जगताप यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले. वयाच्या 54 व्या वर्षी माणिकराव जगताप यांनी अखेरचा श्वास घेतला. मुंबईत रविवारी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास अल्पशा आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. विद्यार्थी काँग्रेसमधून जगताप यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर युवक काँग्रेसमध्ये अनेक पदे भूषवली. 2004 मध्ये झालेल्या निवडणुकीत ते महाड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांच्या जाण्याने रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदाची जागा सद्या रिक्त आहे.
रायगड जिल्हाध्यक्ष पदावर बसण्यासाठी अनेक काँग्रेस कार्यकर्ते उत्साही आहेत. त्यात अभिजीत पाटील, महेंद्र तुकाराम घरत, श्रद्धा ठाकूर , प्रवीण ठाकूर , राजाभाऊ ठाकूर, ज्ञानदेव पवार, चंद्रकांत पाटील, जनार्दन जोशी, बाबा कुलकर्णी, अशोक मुंडे, श्रुती म्हात्रे यांची नावे चर्चेत आणि उत्साहित सुद्धा आहेत.
रायगड काँग्रेस म्हणजे बॅरिस्टर ए आर अंतुले असे समीकरण होते. रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचा प्राबल्य असताना आमदार ती थेट केंद्रीय मंत्री असा प्रवास त्यांचा रंगला होता. म्हणूनच रायगडची संपूर्ण धुरा हे बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या हातात दिली गेली. त्यानंतर अंतुले यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांना मोठ्या पदांमध्ये जागा सुद्धा दिली. त्यामध्ये माजी खासदार रामशेठ ठाकूर, उरण अलिबागचे माजी आमदार दिवंगत मधूशेठ ठाकूर, माजी मंत्री रविशेठ पाटील, माजी आमदार मुस्ताक भाई अंतुले, तत्कालीन रायगड जिल्हा अध्यक्ष आर सी घरत, दिवंगत माजी आमदार माणिकराव जगताप आणि इतर यांच्या नावाचा सुद्धा समावेश होतो. मात्र, बॅरिस्टर अंतुले यांच्या निधनानंतर रायगड काँग्रेस कमिटी पूर्णतः पत्त्यांसारखी कोसळली आणि त्यानंतर ही सर्व मंडळी आपल्या आपल्या शहर आणि तालुका पुरतीच मर्यादित राहिली.
रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावर महेंद्र घरत यांची वर्णी लागणार जवळपास निश्चित झाले असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. महेंद्र घरत गेली अनेक वर्ष काँग्रेस उरण, पनवेलचे काम करीत आहेत. निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये त्यांचे सुद्धा नाव घेतले जाते. मात्र, आता काँग्रेसमध्ये तरुण आणि निष्ठावान उमेदवारांना संधी मिळणार का? रायगड जिल्हा काँग्रेस तरुणांना संधी देईल शकेल का? अशीच चर्चा सध्या रायगड जिल्ह्यामध्ये रंगू लागली आहे. उद्या तरुण मंडळींना जरी संधी दिली तर हे तरुण रायगड जिल्ह्याची धुरा कितपत सांभाळू शकतात याबाबत सुद्धा विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
दि. बा. पाटलांच्या नावासाठी गावागावत मशाल मोर्चा, 16 तारखेला विमानतळाचे काम बंद आंदोलनhttps://t.co/xlXvlYJ3nL#DiBaPatil #NaviMumbaiInternatinalAirport #MashalMorcha
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 9, 2021
संबंधित बातम्या :
नवी मुंबई महानगरपालिकेने पूरग्रस्त भागात केलेल्या मदतकार्याची चिपळूणकरांनी आभार मानत केली प्रशंसा
नवी मुबंईत कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानं काळजी घ्या, महापालिकेचं नागरिकांना आवाहन