Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navneet Rana : नवनीत राणांना ईडीची नोटीस देऊन शाह, मोदींनी हनुमान चालीसा कार्यक्रम दिला, मंत्री बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

आता मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी एक मोठा गोप्यस्फोट केला आहे. ईडीने नोटीस बजावल्यानंतर राणा दाम्पत्याने हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम हाती घेतला, असे खळबळजनक विधान बच्चू कडू यांनी केले आहे.

Navneet Rana : नवनीत राणांना ईडीची नोटीस देऊन शाह, मोदींनी हनुमान चालीसा कार्यक्रम दिला, मंत्री बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
नवनीत राणांना ईडीची नोटीस देऊन शाह, मोदींनी हनुमान चालीसा कार्यक्रम दिला, मंत्री बच्चू कडू यांचा गौप्यस्फोटImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 3:31 PM

जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात हनुमान चालीसावरून (Hanuman Chalisa) वाद सुरू आहे. त्यातल्या त्यात खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा यांची मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा, त्यानंतर झालेला वाद, आणि अटकही बरीच चर्चेत राहिली. त्यातच गुरूवारी नवनीत राणांना हनुमान चालीसा म्हणून दाखवा म्हणाऱ्या तरुणाची ऑडिओ क्लिपही बरीच व्हायरल झाली. तर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाच्या हट्टावरून राज ठाकरे यांनीही जोरदार निशाणा साधला, मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करायला ती काय मशीद आहे का? असा सवला त्यांनी पुण्यातून केला. मात्र आता मंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी एक मोठा गोप्यस्फोट केला आहे. ईडीने नोटीस बजावल्यानंतर राणा दाम्पत्याने हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम हाती घेतला, असे खळबळजनक विधान बच्चू कडू यांनी केले आहे.

मोदी, शाह यांनी हनुमान चालीसा कार्यक्रम दिला

याबाबत बोलताना मंत्री बच्चू कडू म्हणाले, नवनीत राणा यांना ईडीची नोटीस आली होती. त्यानंतर मोदी आणि अमित शहा यांनी त्यांना हनुमान चालीसाचा पठणाचा कार्यक्रम दिला, म्हणून नवनीत राणा यांच्यावरचं ईडीचं संकट टळलं, असा गौप्यस्फोट बच्चू कडू यांनी केला. तसेच याच कारणामुळे नवनीत राणा यांच्या पोस्टरवर मोदी आणि शाह यांचे फोटो झळकले असावेत, असा चिमटाही त्यांनी काढला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच राणा यांना तुरूंगात मारहाण झाली नाही याबाबत त्यांनी आभार मानले पाहिजेत असेही विधान बच्चू कडू यांनीच केले होते. गेल्या अनेक दिवसांपासून रााणा दाम्पत्य याच हनुमान चालीसा पठणावरून शिवसेनेच्याही टार्गेटवर आहे.

हनुमान चालीसा पठणाचा वाद दिल्लीपर्यंत

महाराष्ट्रात सुरू झालेला हनुमान चालीसा पठणाचा हा राजकीय वाद थेट दिल्लीपर्यंत पोहोचला. कारण आपल्याला जेलमध्ये योग्य वागणूक मिळाला नसल्याचा आरोप खासदार नवनीत राणा यांच्याकडून करण्यात आला. तसेच त्यांच्या आरोग्याकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याची तक्रार नवनीत राणा यांनी थेट लोकसभा अध्यक्षांकडे केली. त्यानंतर भाजप नेत्यांनीही यावरून महाराष्ट्र सरकारवर टीकेची झोड उडवली. मात्र अजूनही हा वाद संपलेला नाही. अलिकडेच केंद्रीय तपास यंत्रणांनी राज्यात कारवाईचा धडका लावला असताना, आणि सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरूनच आरोप प्रत्यारोप सुरू असताना, मंत्री बच्चू कडू यांनी केलेलं हे विधान आता चांगलेच चर्चेत आले आहे.

हे सुद्धा वाचा
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....