शंकराच्या पिंडीवर संत्र्याची फोड, रवीजींचं बोलणं… नवनीत राणा यांचा भन्नाट उखाणा
मकर संक्रांतीच्या निमित्ताने राणा दांपत्याच्यावतीने अमरावतीच्या हनुमान गढीवर पतंग महोत्सवाचे आयोजन केले आहे. नवनीत राणांनी उडवली भाजपाची पतंग तर रवी राणांनी उडवली युवा स्वाभिमानची पतंग उडविली.
अमरावती येथील राणा दाम्पत्याचं राजकारण म्हणजे चर्चेचा विषय असतो. आज अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याचा पतंग महोत्सव साजरा झाला. या वेळी आमदार रवी राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाची पतंग बदवली तर भाजपच्या नेत्या माजी खासदार नववीत राणा यांनी भाजपाची पतंग बदवली..राणा दांपत्याकडून दरवर्षी या पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. यंदा रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्ष आणि भाजपाच्या संयुक्त युतीच्या पंतगांनी आकाशात चांगलीच भरारी घेतलीय…
राणा दाम्पत्याचा पंतगमहोत्सव आज अमरावतीत साजरा होत आहे. या पंतगमहोत्सवाला मेळघाटचे भजपाचे आमदार केवळराम काळे यांनी सुद्धा हजेरी लावत पतंग महोत्सव साजरा केला. यावेळी वनीत राणा यांनी उखाणा घेत सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपण भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे यावर्षी भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाची पतंग उडवली आणि आकाशात सुद्धा महायुतीचे गटबंधन दिसून आले असे यावेळी राणा दाम्पत्याने सांगितले. नवनीत राणा म्हणाल्या की राजकारणात लिमिट क्रॉस करून कोणी कोणावर बोलू नये, जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप कडू बोलतात त्यांना माझा एकच सल्ला आहे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला…
याप्रसंगी नवनीत राणा यांनी त्यांच्या खास अंदाजात उखाणा घेतला..त्या म्हणाल्या की…
“माझ्या श्वासापेक्षाही जास्त महत्व रवी राणा यांचं माझ्या जीवनात आहे, शंकराच्या पिंडीवर संत्र्याची फोड रवीजींचं बोलणं साखरपेक्षा गोड “… असे म्हणताच सर्वांनी टाळ्या वाजत दोघांना मकरसंक्रातीच्या शुभेच्छा दिल्या.
ही भक्कम आणि घट्ट महायुती आहे ज्याप्रमाणे आम्ही विधानसभेत अनेकांच्या पतंगा कापल्या, मजबूत उमेदवार भाजपचे निवडून आले, या पतंगांप्रमाणेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासाच्या माध्यमातून मोठी भरारी घेणार आहेत असे यावेळी आमदार रवी राणा म्हणाले.
उद्धव ठाकरे गोड गोड बोलतील..
मकर संक्रांतीच्या सणानिमित्त विरोधकांनो तिळगुळ खा आणि गोड गोड बोला, उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्या भेटी घेतल्या त्यामुळे मला असं वाटते की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व त्यांना आवडायला लागलं आहे, त्यामुळे हे संकेत आहे उद्धव ठाकरे तिळगुळ खातील आणि महायुती सोबत गोड गोड बोलतील असेही ते म्हणाले.
महायुती आता फक्त जमिनीवरच नाही तर आकाशात देखील आहे आकाशामध्ये भाजपा आणि युवा स्वाभिमानचे मिलन पतंगांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पतंगा प्रमाणेच महाराष्ट्रात देखील आता भरारी घेणार आहे. जे दिवस-रात्र उठून कडू बोलतात ज्यांच्याकडे गोड शब्दच नाही अशा लोकांना माझा सल्ला आहे सगळ्यांनी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे नवनीत राणा यांनी शुभेच्छा देताना सांगितले. ज्या पद्धतीने रवीभाऊ आणि देवा भाऊ गोड बोलतात तसेच गोड बोलावे असा टोला यावेळी नवनीत राणा यांनी संजय राऊत यांना लगावला. आमच्या महायुतीमध्ये कुठलीही स्पर्धा नाही एकमेकांना साथ देण्यासाठी ही महायुती आहे. आम्ही पतंग कापण्यासाठी नाहीतर सोबत साथ देण्यासाठी आकाशात आहे. अमरावती जिल्ह्यात विरोधकांच्या पतंग कापून महायुतीचा झेंडा रोवला. मुंबई महानगरपालिकेत देखील महायुतीची सत्ता येणार बऱ्याचशा लोकांची पतंग आम्ही कापू असेही यावेळी नवनीत राणा म्हणाल्या.
रवी राणा यांचा दावा, पुढच्या मकरसंक्रातीला…
आम्ही आता अनेकांच्या पतंगा कापणार आहे. महायुती मजबूत आहे विधानसभेमध्ये त्याच चित्र पाहायला मिळालं आहे.ज्या लोकांनी लोकसभेमध्ये नवनीत राणा यांचा पराभव केला त्यांची देखील पतंग विधानसभेत आम्ही कापली आहे. मी त्यांना मकर संक्रांतीच्या निमित्ताने निमंत्रण देतो सर्व माजी आमदारांनी गंगा सावित्री निवासस्थानावर चहा घ्यायला किंवा मला बोलावलं तर मी सुद्धा चहा घ्यायला घरी जाणार तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.उद्धव ठाकरे यांना ही विनंती आहे की त्यांनी तिळगुळ खावं आणि देवेंद्र फडणवीस यांना भेटावं. पुढच्या मकर संक्रांति पर्यंत उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिसतील. मोदींचे नेतृत्व खुल्या मनाने जर स्वीकारले तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जाणार आहे. बच्चू कडू यांना विनंती आहे लोकशाहीने दिलेला निर्णय त्यांनी स्वीकारला पाहिजे असेही त्या म्हणाल्या.