Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navneet Rana : तुम्ही तुमच्या मानेचे रिपोर्ट द्या, मी माझ्या बॉडीचे देते, पेडणेकर, कायंदेंच्या लीलावती मोहीमेवर नवनीत राणा आक्रमक

महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेना नेत्या मनिषा कायंदे या थेट लिलावती रुग्णालयात धडकल्या. त्यांनी नवनीत राणा यांच्या एमआरए रिपोर्टवरून डॉक्टरांना धारेवर धरलं. त्यावर आता लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला दिल्लीत पोहचलेल्या नवनीत राणा यांनीही पलटवार केलाय.

Navneet Rana : तुम्ही तुमच्या मानेचे रिपोर्ट द्या, मी माझ्या बॉडीचे देते, पेडणेकर, कायंदेंच्या लीलावती मोहीमेवर नवनीत राणा आक्रमक
तुम्ही तुमच्या मानेचे रिपोर्ट द्या, मी माझ्या बॉडीचे देते, पेडणेकर, कायंदेंच्या लीलावती मोहीमेवर नवनीत राणा आक्रमकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 2:57 PM

नवी दिल्ली : मुंबई ते दिल्लीच्या राजकारणात सध्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) हे नाव चांगलेच चर्चेत आहे. खासदार नवनीत राणा यांना जेलमध्ये मिळालेल्या वागणुकीवर झालेले आरोप आणि लिलावती रुग्णलयातील (Lilavati Hospital) उपचार यावरून शिवसेना आणि राणा दाम्पत्य पुन्हा आमनेसामने आले आहेत. नवनीत राणा यांनी कोर्टाच्या आदेशाचे पालन केले नाही. त्यांनी मीडियाला प्रतिक्रिया दिल्या, मग त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा अशी मागणी करणारा अर्ज सरकारकडून कोर्टात करण्यात आला. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही तर महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेना नेत्या मनिषा कायंदे या थेट लिलावती रुग्णालयात धडकल्या. त्यांनी नवनीत राणा यांच्या एमआरए रिपोर्टवरून डॉक्टरांना धारेवर धरलं. त्यावर आता लोकसभा अध्यक्षांच्या भेटीला दिल्लीत पोहचलेल्या नवनीत राणा यांनीही पलटवार केलाय. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांना टार्गेट करत तुम्ही तुमच्या मानेचे रिपोर्ट द्या, मी माझ्या बॉडीचे देते असे थेट आव्हान दिलंय.

नवनीत राणा काय म्हणाल्या?

तसेच आम्हाला कोर्टाने जे आदेश दिले त्याचे पालन केले आहे. मी कोर्टातील प्रक्रियेबाबत बोलत नाही. मात्र हे हनुमान चालीसा वाचल्यास सरकार पडू शकते असे कोर्टात म्हणाले. पण आमच्यासोबत जे घडलं त्याबाबत बोलण्याचा अधिकार आम्हाला संविधानाने दिला आहे. तसेच राजकारणात आम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे. मी कोर्टाच्या निर्णयाबद्दल काहीही बोलले नाही. मी प्रत्येक गोष्ट कोर्टाच्या आदेशाप्रमाणे करत आहे. हनुमान चालीसा वाचण्यासाठी आम्हाला भाजपच्याा आधाराची गरज नाही.

आधी यांच्या आजारपणाचे रिपोर्ट द्यावे

मात्र त्यांची सत्ता आहे, त्यामुळे ते सत्तेचा दुरोपयोग करत आहेत. माझ्या घरावर कारवाई ही सत्तेचा दुरोपयोग आहे. यांनी अनेक लोकांची घरं तोडली. मात्र जिथं लोकांचं ट्रिटमेंट होते तिथे जाऊन हे करू नये. हे रुग्णालयापर्यंत पोहोचले हेही सुडबुद्धीने आहे. उद्या उद्धव ठाकरे यांनी लिलावती तोडले तरी आश्चर्य नको वाटायला. यांनी आधी यांच्या आजारपणाचे रिपोर्ट द्यावे, उद्धव ठाकरे दोन वर्षे मंत्रालयात का गेले नाही याचा रिपोर्ट द्यावा, असे म्हणत त्यांनी पुन्हा हल्लाबोल चढवला. तर मला बेघर केलं तरी मी माझी लढाई लढणार आहे. त्यासाठी मी जाऊन लोकसभा अध्यक्षांना भेटणार आहे. असेही त्या म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

रवी राणा काय म्हणाले?

तर यावेळी आमदार रवी राणा यांनीही दिल्लीतून पुन्हा ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. माझ्या घरावरील कारवाई ही उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून आहे. आमचं मुंबईत एकच घर आहे. शिवसेनेच्या नेत्यांसारखी आमच्याकडे दहा घरं नाहीत. यांनी जाऊन पाहवं आणि हवं तर संजय राऊत आणि अनिल परबांनाही घर नेऊन दाखवावं. कारण आता त्यांना तेवढेच काम उरले आहे, असा टोला राणा यांनी लगावला.

उद्धव ठाकरेंना ग्राऊंड नॉलेज नाही-राणा

तसेच यांनी मनमानी सुरू केली. दोन लोकांनी हनुमान चालीसा वाचण्याने सरकार पडेल असे कोर्टात सांगतात. तर सरकार पाडायची गरज नाही जनता या सरकारला त्यांची जागा दाखवले. हनुमानाने लंका जाळली, तशी परिस्थिती उद्धव ठाकरे यांची होणार आहे. मी तीनवेळा शिवसेनेच्या उमेदवरांना हरवलं. मी लोकांची सेवा करतो. मागच्यावेळी यांनी मला जेलमध्ये टाकलं, असा आरोपही त्यांनी केला आहे. तर उद्धव ठाकरेंना ग्राऊंड लेव्हलचं शून्य नॉलेज आहे. कोणतं पिकं येतं, कोणतं खत लागलं काही यांना माहिती नाही. उद्धव ठाकरेंनी हवा तो मतदारसंघ निवडूण लढून दाखवावं. लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील, असा इशाराही नवी राणा यांनी दिला आहे.

'माझ्या नातवाला शेतीची आवड आहे..', एकनाथ शिंदे नातवासोबत शेतात रमले
'माझ्या नातवाला शेतीची आवड आहे..', एकनाथ शिंदे नातवासोबत शेतात रमले.
दत्ता गाडेची गुगल हिस्ट्री चेक अन वारंवार पॉर्न...धक्कादायक माहिती उघड
दत्ता गाडेची गुगल हिस्ट्री चेक अन वारंवार पॉर्न...धक्कादायक माहिती उघड.
मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
मराठी माणसांच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून.., राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'
'हिंदी'विरोधात दादरमध्ये जागोजागी तुफान बॅनरबाजी, 'हिंदू आहोत पण...'.
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार
अपघातग्रस्तांना 1 लाखापर्यंत कॅशलेस उपचार मिळणार.
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध
उद्या बोलाल गुजराती शिका, परवा बोलाल.. 'हिंदी'सक्तीचा मनसेकडून विरोध.
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण
बीडमध्ये वकिली करणाऱ्या महिलेला अंग काळंनिळं होईपर्यंत बेदम मारहाण.
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
सिंधुदुर्गचं बीड होणार? वैभव नाईक यांचे गंभीर आरोप.
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार
रविवारी लोकलने प्रवास करताय? 'या' स्थानकांवर रेल्वे सेवा नसणार.
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप
मोदी आणि शहांना इंग्रजी येत नाही, म्हणून.. ; संजय राऊतांचा थेट आरोप.