Navneet Rana : राज्यातलं आणखी एक भांडण दिल्ली दरबारी, नवनीत राणा लोकसभेत का कडाडल्या?

सकाळी रवी राणांनी (Ravi Rana) काही गंभीर आरोप केले. त्याचेही पडसाद लोकसभेत उमटले. आमदार रवी राणा यांच्यावरील गुन्ह्याबाबत खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. आणि राज्य सरकारवर आरोप केले.

Navneet Rana : राज्यातलं आणखी एक भांडण दिल्ली दरबारी, नवनीत राणा लोकसभेत का कडाडल्या?
नवनीत राणांचा गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 10:48 PM

नवी दिल्ली : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि त्यांनी लोकसभेत (Loksabha) उपस्थित केले प्रश्न नेहीमीच चर्चेत असतात. आजही लोकसभेत नवनीत राणा यांनी काही मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारच्या वाईन विक्रीच्या नव्या निर्णयाचा काही स्तरातून विरोधत होत आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने वाइन विक्रीचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी नवनीत राणा यांनी आज लोकसभेतही लावून धरली. याच वाईन विक्रीवरून राज्यात भाजप आणि महाविकास आघाडीतही टोकाचा संघर्ष पेटला आहे. चंद्रकांत पाटील आणि रुपाली चाकरणकर यांच्यात तर सध्या यावरून जोरदार वाकयुद्द सुरू आहे. हाच मुद्दा नवनीत राणा यांनी आज लोकसभेत उपस्थित केला. एवढेच नाही तर सकाळी रवी राणांनी (Ravi Rana) काही गंभीर आरोप केले. त्याचेही पडसाद लोकसभेत उमटले. आमदार रवी राणा यांच्यावरील गुन्ह्याबाबत खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. आणि राज्य सरकारवर आरोप केले.

सोमय्यांच्या बाबतीत जे झालं तेच होतंय

भाजप नेते किरीट सोमय्या हेही सध्या चांगलेच चर्चेत आहेत. पुण्यात किरीट समोय्या यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार पार दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. यावरूनच चंद्रकांत पाटलांनी महाविकास आघाडीला हे महागात पडेल असा थेट इशारा दिलाय. किरीट सोमय्या, नितेश राणे यांच्यासोबत जे झालं ते आमदार रवी राणा यांच्या सोबत महाराष्ट्रात होत आहे. असा आरोप नवनीत राणा यांनी लोकसभेत केला आहे. भाजप आमदार नितेश राणे शिवसैनिक सतोष परब हल्ला प्रकरणात गेल्या काही दिवासांपासून अटकेत होते. नितेश राणेंना यांना सुडापोटी अडकवले जात असल्याचा आरोप भाजपकडून वेळोवेळी करण्यात आला आहे. तेच आता रवी राणांच्या बाबतीत होतंय. रवी राणा यांनाही सुडापोटी अडकवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. असा आरोप नवनीत राणा यांनी लोकसभेत केला आहे.

लोकसभेत नवनीत राणांचे आरोप

रवी राणांचा आरोप काय?

आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. कुठल्या ना कुठल्या प्रकरणात अडकवा, असा आदेशच उद्धव ठाकरेंनी दिल्याचं रवी राणा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पोलिसांच्या मदतीनं दबावतंत्र महाराष्ट्र सरकारकडून वापरलं जात असल्याचा आरोप रवी राणांनी केलाय. देशात शाईफेकीच्या घटना घडल्या, पण 307 म्हणजेच जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा माझ्यावर गुन्हा दाखल झाला, यातून नेमकं काय प्रतीत होत असा प्रश्न रवी राणा यांनी उपस्थित केलाय. संजय राऊत, अनिल परब, दिलीप वळसे, मुख्यमंत्र्यांनी सीपींना फोन लावून सांगितलं की रवी राणाला अटक करा, असंही त्यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल, तर संजय राऊतांवरही 506 चा गुन्हा दाखल करा असं थेट आव्हान रवी राणा यांनी यावेळी दिलं. येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे, अनिल परबच्या प्रॉपर्टींवर कारवाई होईल, आणि मीही पुरावे देईन, असे आरोप आमदार रवी राणा यांनी केले आहेत.

Video : चंद्रकांत पाटलांनी बुद्धीचा आवाका वाढवावा, रुपाली चाकणकरांनी दादाचं बौद्धिकही काढलं

बाळासाहेबांवर कारवाई करणााऱ्यांबरोबर सरकारमध्ये, बाघोबा म्हणून घेणारे चौकशीला का घाबरता? मुनगंटीवारांचा खोचक सवाल

किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला महागात पडेल, चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला थेट इशारा

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.