कोजागिरी पौर्णिमा काळात 3 दिवस उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश बंदी, तर तुळजापुरात संचारबंदी

कोजागिरी पौर्णिमा काळात 3 दिवस उस्मानाबाद जिल्हा बंदी लागू असणार आहे. त्याचबरोबर तुळजापूर शहरात संचारबंदी आदेश लागू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिलीय.

कोजागिरी पौर्णिमा काळात 3 दिवस उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश बंदी, तर तुळजापुरात संचारबंदी
तुळजाभवानी
Follow us
| Updated on: Oct 16, 2021 | 8:52 PM

उस्मानाबाद : नवरात्रौत्सव काळात तुळजाभवानी मंदिराच भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. ही गर्दी कोजागिरी पौर्णिमेपर्यंत कायम असते. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्या प्रशासनानं आज महत्वाचा निर्णय घेतलाय. कोजागिरी पौर्णिमा काळात 3 दिवस उस्मानाबाद जिल्हा बंदी लागू असणार आहे. त्याचबरोबर तुळजापूर शहरात संचारबंदी आदेश लागू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिलीय. (Osmanabad district entry ban for 3 days during Kojagiri full moon, curfew imposed in Tuljapur)

कोजागिरी पौर्णिमेला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यातून भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येत असतात. या काळात भाविकांची मोठी गर्दी होत असते. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर तुळजापुरात होणारी गर्दी टाळण्यासाठी कोजागिरी पौर्णिमा काळात 3 दिवस एकही वाहन किंवा भाविक जिल्हात येऊ दिला जाणार नाही, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

कोजागिरी पौर्णिमेपूर्वी एक दिवस आणि पौर्णिमेदिवशी आणि पौर्णिमेनंतर एक दिवस असे तीन दिवस तूळजापूर शहरात संचारबंदी, तर उस्मानाबाद जिल्हा सीमा बंदी लागू असणार आहे. या काळात जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करुन तिथे पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी यांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार तुळजापूर शहर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांना रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

नवरात्री काळात जिल्हा प्रशासनाचे नियम

परराज्यातील ज्या भाविकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांना जिल्ह्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही. मात्र लसीकरण न झालेल्या राज्याबाहेरील भाविकांना उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तासाच्या आतला आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आली आहे.

यात्रा काळात कोरोना नियमांचे पालन बंधनकारक असून हॉटेल, दुकानात असलेल्या कर्मचारी यांचे 2 डोस झालेले असून त्याची यादी प्रशासनाला कळवावी लागणार आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी शारदीय नवरात्र उत्सव कसा साजरा करावा याबाबत लेखी आदेश काढले होते.

दररोज 15 हजार भाविकांनाच दर्शन

गर्दी होऊ नये व कोरोना नियमांचे पालन करावे यासाठी दररोज पहाटे 4 ते रात्री 10 या वेळेत फक्त 15 हजार भाविकांना प्रवेश देण्यात येत आहे. तुळजापूर येथे दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात त्यात 15 हजार भाविकांची प्रवेश मर्यादा घातल्याने आगामी काळात गर्दीवर नियंत्रण आणणे प्रशासनासमोर एक मोठे आव्हान होतं.

कुणाला प्रवेश नाही?

तुळजाभवानी मंदीरात 65 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती, गरोदर स्त्रिया व 10 वर्षाखालील बालके यांना प्रवेश नसणार नाही. याबाबत मंदिर व्यवस्थापनाने उपाययोजना कराव्यात तसेच मास्क, सॅनिटायझर वापरावे.

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 21 ऑक्टोबरपर्यंत मंदिराच्या परिसरातील 200 मीटरपर्यंत सोललेले नारळ आणि सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्व भाविकांनी प्रशासनाकडून केलेल्या सूचनांचे आणि नियमांचे पालन करुन सहकार्य करावे,असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदार यांनी केले आहे.

इतर बातम्या :

पंकजा मुंडेंच्या प्रश्नावर पवार का म्हणाले, त्या एवढ्या मोठ्या नेत्या नाहीत? प्रेसमध्ये नेमकं काय घडलं?

Pune Municipal Election : पुणे महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांचे बडे नेते कामाला, कोण कुणावर भारी ठरणार?

Navratri 2021 Osmanabad district entry ban for 3 days during Kojagiri full moon, curfew imposed in Tuljapur

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.