चतु:श्रृंगी मंदिरात गुरुवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात; मंदिर प्रशासन सज्ज, ऑनलाईन दर्शनाची सुविधा

पुण्यातील चतु:शृंगी देवीच्या मंदिरात घटस्थापनेला येत्या गुरुवारपासून (7 ऑक्‍टोबर) ते विजयादशमी (15 ऑक्‍टोबर) शारदीय नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तशी माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष नितीन अनगळ आणि कार्यकारी विश्वस्त श्रीधर अनगळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितली आहे.

चतु:श्रृंगी मंदिरात गुरुवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात; मंदिर प्रशासन सज्ज, ऑनलाईन दर्शनाची सुविधा
चतु:श्रृंगी मंदिर
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 6:27 PM

पुणे : नवरात्रौत्सवाला 7 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. पुण्यातील चतु:शृंगी देवीच्या मंदिरात घटस्थापनेला येत्या गुरुवारपासून (7 ऑक्‍टोबर) ते विजयादशमी (15 ऑक्‍टोबर) शारदीय नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तशी माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष नितीन अनगळ आणि कार्यकारी विश्वस्त श्रीधर अनगळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितली आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजता अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करण्यात येणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता घटस्थापना करण्यात येईल. (Navratri festival starts from October 7 at Chatushringi temple in Pune)

दररोज सकाळी दहा आणि रात्री आठ वाजता महाआरती असेल. मंदिर सकाळी पाच ते रात्री नऊ या वेळेत भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार आहे. दिलीप अनगळ या वर्षीचे मंदिर व्यवस्थापक असून, नारायण कानडे गुरुजी पौरोहित्य करणार आहेत. तर गुरुवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजता नवचंडीचा होम करण्यात येणार आहे. शुक्रवारी 15 ऑक्टोबर रोजी विजयादशमीनिमित्त संध्याकाळी पाच वाजता मंदिर परिसरात विश्वस्त आणि सेवकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने सीमोल्लंघनाची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

कोरोना नियमांचे पालन बंधनकारक

राज्य सरकारने 7 ऑक्टोबरपासून राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या संदर्भातील सर्व नियमांचे तंतोतंत पालन करण्यात येणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व विश्वस्त आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. मंदिराच्या परिसरात मुखपट्टीचा वापर बंधनकारक करण्यात आला असून. प्रवेशद्वारावर सॅनिटायझर, ताप मोजण्याची सोय करण्यात आली आहे.

सोशल डिस्टनसिंगचे पालन व्हावे यासाठी दर्शन रांगेत भाविकांना उभे राहाण्यासाठी रंगांनी खुणा करण्यात आल्या आहेत. महिला आणि पुरुषांच्या स्वतंत्र रांगा असणार आहेत. कुटुंबियांना एकत्र पुरुषांच्या रांगेत प्रवेश मिळू शकेल. या वर्षी अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसाठी (व्हीआयपी) स्वतंत्र रांग किंवा प्रवेशाची व्यवस्था करण्यात आलेली नाही. शासनाच्या वतीने वेळोवेळी जाहीर केलेल्या नियमावलीचे पालन करण्यात येईल.

भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था

भाविकांना देवीचे ऑनलाइन दर्शन घेता यावे यासाठी देवस्थानच्या वतीने विशेष सोय करण्यात आलेली आहे. भाविकांना chatturshringidevasthanpune.org या संकेतस्थळावर ऑनलाइन दर्शन घेता येईल किंवा फेसबुक पेज https://www.facebook.com/ChatturshringiDevasthan वर किंवा यूट्यूब https;//shortly.cc/Vqcvk या समाज माध्यमांवर दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भाविकांना देणगी देण्यासाठी jirnodhar@upi या अपचा उपयोग करता येर्इल.

सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून भाविकांचा मंदिर परिसरात यात्रेसह दोन कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. पोलीय यंत्रणा, खासगी सुरक्षा रक्षक, मंदिरात बंदुकधारी सुरक्षा रक्षक यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. परिसरात 21 सीसीटीव्हींची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आपत्कालिन व्यवस्थापन आणि उपचारांसाठी डॉक्टरांचे पथक आणि रुग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे.

मंदिर परिसरात सर्व सोयी-सुविधा

मंदिर आणि परिसराची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्तनपानासाठी दोन हिरकणी कक्ष, किटकनाशकांची फवारणी, कचरा संकलन, स्वच्छता, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य वाहनतळ व्यवस्था, अग्निशमन दलाची गाडी, गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी बॅरिकेटस आदी व्यवस्था पूर्ण करण्यात आल्या आहेत.

इतर बातम्या : 

पंकजा मुंडे आजारी, विरोधी पक्षनेत्यांचा बीड जिल्ह्यातील पाहणी दौरा रद्द!

अतिवृष्टीचा शेतकऱ्यांना फटका; आमदार नमिता मुंदडांचं धनंजय मुंडेवर टीकास्त्र

Navratri festival starts from October 7 at Chatushringi temple in Pune

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.