नवाब मलिकांना 8 दिवसांची ईडी कोठडी! देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, ‘टेरर फंडिंग’चा गंभीर आरोप

काही वेळापूर्वीच मलिकांना न्यायालयाने आठ दिवासांची कोठडी सुनवाली आहे. त्यानंतर फडणवीस बोलत होते. दाऊद भारतातून टेरर फंडींग करतोय. आज ईडीने नऊ ठिकाणी सर्च केला. त्यातून अनेक लिंक बाहेर आल्या. त्यातलं एक प्रकरण नवाब मलिक यांच्याशी संबंधित आहे. असे फडणवीस म्हणाले.

नवाब मलिकांना 8 दिवसांची ईडी कोठडी! देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, 'टेरर फंडिंग'चा गंभीर आरोप
फडणवीसांचे मलिकांवर गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 9:30 PM

मुंबई : राज्यात सध्या मलिकांच्या (Nawab Malik Arrest) अटकेवरून जोरदार घमासान सुरू आहे. यावरूनच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार हल्लाबोल चढवत ही अटक कायदेशीर आहे, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी दाऊदशी संबंधित काही तिखट सवाल महाविकास (Mahavikas Aghadi) आघाडी आणि मलिकांना केले आहेत. काही वेळापूर्वीच मलिकांना न्यायालयाने आठ दिवासांची कोठडी सुनवाली आहे. त्यानंतर फडणवीस बोलत होते. दाऊद भारतातून टेरर फंडींग करतोय. आज ईडीने नऊ ठिकाणी सर्च केला. त्यातून अनेक लिंक बाहेर आल्या. त्यातलं एक प्रकरण नवाब मलिक यांच्याशी संबंधित आहे. मंत्र नवाब मलिक यांनी घेतलेली जमीन बॉम्बस्फोटातील आरोपांकडून घेतलीय. त्यातला एक हसीना पारकरचा ड्राईव्हर आहे. जमीनीच्या मालकांनी सांगितलं पैसे नाही मिळाले. असा आरोप फडणवीसांनी केला आहे, तर इतर काही मुद्द्यावरूनही फडणवीसांनी जोरदार बॅटिंग केली.

व्यवहाराबद्दल फडणवीस काय म्हणाले?

या जमिनीसाठी आमच्यावर दबाव टाकला. केवळ अतिक्रण काढण्याकरता पॉवर ऑफ अॅटोर्नी दिली. मात्र आम्हाला एकही पैसा मिळाला नाही. ज्या ठिकाणी हे सौदे झाले. ज्या ठिकाणी हसीना पारकर सौदा करत होती. त्या लोकांची साक्ष आहे. हसीन पारकरला 55 लाख दिल्याचे पुरावे ईडीकडे आहेत. ही जमीन अंडरवर्ल्डच्या मदतीने नवाब मलिकांना मिळाली. यातले सगळे पैसे अंडरवर्ल्डला गेले. हजारो कोटी हसीना पारकर म्हणजे दाऊदला गेले. एखाद्या मंत्र्याने बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन का घेतली? हसीना पारकशी व्यवहार का केला. या व्यवहारानंतर तीन वेळा बॉम्बस्फोट. जे लोकं बॉम्बस्फोट करतात अशा लोकांना पैसे देणे निंदनीय आहे. अशी टीका फडणवीसांनी केली आहे.

सरकारने मलिकांना वाचवणे निंदनिय

तसेच ईडीने सर्वांचे जबाब घेतले आहेत. मूळ मालकांनी एकही पैसा मिळाला नाही असे सर्व सांगितले आहे. ईडीने केलेली कारवाई नियमानुसार आहे. अशा प्रकारे मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि देशाचा दुष्मन दाऊच्या बहिणीशी व्यवहार कसा केला जाऊ शकतो. त्यामुळेच कोर्टाने त्यांना कस्टडी दिली आहे. हे अतिशय गंभीर आहे. कुठल्याही राजकीय पक्षाने टेरर फंडिंग होण्याला निषेध केला पाहिजे. यात राजकारण केलं नाही पाहिजे, सर्वांनी एकत्र दाऊदविरोधात भूमिका मांडली पाहिजे. तसेच माझ्याकडे जी कागदपत्र होती ती मी ईडी आणि एनआयएला दिली आहेत. असेही फडणवीस म्हणाले आहेत. देशात यामुळे अतिशय चुकीचा संदेस जाईल की दाऊदशी व्यवहार करणाऱ्याला सरकार वाचवतंय. असेही ते म्हणाले.

Breaking : नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी, तर मलिकांचा भाजपला सूचक इशारा!

Nawab Malik Arrest : नवाब मलिकांना अटक, आघाडीचे नेते काय करणार? पवारांच्या भेटीनंतर भुजबळांनी कार्यक्रम सांगितला

मलिकांचा राजीनामा घेऊ नका, कंस आणि रावण सुद्धा मारले गेले, संजय राऊत गरजले

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.