रत्नागिरीः अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे दाऊदचे फंट मॅन (Dawood’s Front Man) असा शकतात अशी खळबळजनक आरोप भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केलाय. याच मुद्यावर माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली. दाऊदच्या माणसाकडून कवडीमोल भावात जमीन खेरदी केली. त्यातही ब्लॅक मनीचा वापर झालाय त्याचमुळे याचा ट्रेंड ईडी घेतंय. दाऊद हा देशाचा एक नंबरचा शत्रू आहे. बॉम्ब स्फोट घडवणाऱ्यांकडून तुम्ही जमीन खरेदी करता, यामुळे दाऊदचा खरा फंट मँन नवाब मलिक असू शकतो असा खळबळ जनक आरोप माजी खासदार निलेश राणें यांनी केला आहे.
अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर आता भाजपचे प्रदेश सचिव आणि माजी खासदार निलेश राणेंनी राष्ट्रवादीवर निषाणा साधलाय. निलेश राणे यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निषाणा साधला. ते म्हणाले, ‘ शरद पवार हे गंभीर विषयावर बोलत नाहीत. नबाव मलिक यांच्यासाठी राष्ट्रवादी रस्त्यावर उतरते. नबाव मलिकांचे हे प्रकरण गंभीर आहे. देशाच्या संरक्षणासाठी हे प्रकरण धोका दायक आहे. मलिक यांचा राजीनामा राष्ट्रवादीने घ्यायला पाहिजे, पण पवार साहेबांनी अशा लोकांना पक्षात ठेवता कामा नये असं सांगत निलेश राणे यांनी पवारांवर हल्लाबोल केला. दाऊदचा माणूस पवार यांना चालवतो, युक्रेनसाठी भाजपच्या नेत्यांना फोन लावता, पण यावर काही बोलत नाही, असा खोचक टोला निलेश राणेंनी पवार यांना लगावला.
निलेश राणे यांनी रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टिकेचे लक्ष्य केलं. नबाव मलिक यांना अटक झाल्यावर त्यांच्या प्रकृतीची काळजी सुप्रिया सुळे यांना होती. त्यानंतर हे प्रकरण गंभीर आहे हे लक्षात आल्यावर त्यांच्या ट्विटरवर काल कुठल्या बागेत फुलांची पहाणी करत होत्या? नवाब मलिक यांच्या प्रकृतीची काळजी वाटत होती त्याच दुसऱ्या दिवशी प्राणी संग्रहालयात फुलांची आणि प्राण्यांची पाहणी करत होत्या. यातूनच सर्व प्रकार लक्षात येतो. त्यामुळे त्यांना याचे गांभीर्य कळलं असावं असा टोला निलेश राणेंनी सुप्रिया सुळे यांना लगावला. तर अजित पवार या विषयात काही बोलत नाहीत अजित पवार शांत आहेत. अशा प्रकरणात ते बोलत नाहीत ते आत्मक्लेश करतात असा टोला निलेश राणे यांनी अजित पवार यांना लगावलाय.
निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका करता म्हटले की, शिवसेना अनेक विषयात साईड ट्रॅक होतेय आणि अनेक विषयात अडचणीत आलीय. संजय राऊत ढेपाळले आहेत. आता ते धड बोलू शकत नाही अशी त्यांची अवस्था झाल आहे, अशी खोचक टिका निलेश राणें यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर केलीय.
इतर बातम्या-