अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरी विधानसभा अध्यक्षांनी निवड होणार का? मलिकांनी काय सांगितलं?
या अधिवेशनात अध्यक्षांची निवड होणार असल्याचे महाविकास आघाडीतील नेते सांगत आहेत. आज राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अध्यक्ष निवडीवर भाष्य केले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातच विधानसभा अध्यक्षांची निवड होईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगतले आहे,
मुंबई : गेल्या अधिवेशनावेळी (Assembly Session) विधानसभा अध्यक्ष (Speaker) निवडीसाठी झालेला हायव्होल्टेज ड्राम सगळ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. आधी अध्यक्ष कोण होणार? हे ठरत नसल्याने विधानसभा अध्यपद रिक्त राहिलं. त्यानंतर गेल्या अधिवेशनातच विधनसभा अध्यक्ष निवडीचा घाट महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) घातला. मात्र ऐनवेळी राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या लेटर वॉरने अध्यक्ष निवड राहून गेली. विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी राज्यपालांना जे मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवलं होतं त्यातल्या भाषेवर राज्यपालांनी पत्र लिहून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्याआधी विधानसभा अध्यक्षांची निवड ही गुप्त मतदानाने व्हावी ही भाजपची मागणी होती. तर विधानसभा अध्यक्षांची निवड ही आवाजी मताने करणार, असा पवित्रा महाविकास आघाडीने घेतला होता. त्यानंतर राज्यापालांनी घटनात्मक पेचाचे हत्यार उपसले आणि महाविकास आघाडीला माघार घ्यावी लागली. मात्र या अधिवेशनात अध्यक्षांची निवड होणार असल्याचे महाविकास आघाडीतील नेते सांगत आहेत.
विधानसभा अध्यक्षांची निवड नेमकी कधी?
आज राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अध्यक्ष निवडीवर भाष्य केले आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यातच विधानसभा अध्यक्षांची निवड होईल, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगतले आहे, तर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत महाविकास आघाडीची आज चर्चा झाली. विधानसभा अध्यक्षांची निवड ही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात होईल अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. त्यामुळे अध्यक्ष निवडीवरून याही अधिवेशनात जोरदार पॉलिटिकल राडा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणूक संदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली. राज्यपाल यांना तारीख देण्यासंदर्भातही चर्चा झाली. ही निवडणूक पहिल्या आठवड्यात शक्य नाही. दुसऱ्या आठवड्यात शक्यता आहे, असे मलिक म्हणाले आहेत.
या अधिवेशनात अध्यक्ष निवडीचा पेच सुटणार?
महाविकास आघाडीत विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. सुरूवातील नाना पटोलेंची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली. मात्र नाना पटोलेंचे नाव काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी समोर आल्यानंतर नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले आहे. तेव्हापासून हे पद रिक्तच आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून ऊर्जामंत्री नितीन राऊत, ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, भोरचे आमदार संग्राम थोपटे अशी काही नावं चर्चेत आहेत. या अधिवेशनात तरी अध्यक्ष निवडीचा पेच सुटणार का? हे पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे.
Sanjay Raut Vs Bjp : राणे म्हणाले राऊत राष्ट्रवादीचे, तर राऊतही म्हणाले होय मी राष्ट्रवादी !