नक्षलवादाचे लोकशाहीला पुन्हा आव्हान, आमदारासह प्रशासनालाच थेट दिली धमकी

भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी पश्चिम झोन कमिटीच्या श्रीनिवास नामक नक्षलवाद्यांनी थेट प्रेस नोट काढून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाविरोधात त्यांनी टीका केली आहे.

नक्षलवादाचे लोकशाहीला पुन्हा आव्हान, आमदारासह प्रशासनालाच थेट दिली धमकी
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 3:48 PM

गडचिरोलीःगडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड लोह खनिज प्रकल्पावरून नक्षलवाद आणि प्रशासन हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून लोकप्रतिनिधी धमक्या मिळत असल्याने खळबळ उडाली आहे. सुरजागड लोह खनिज प्रकल्प गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे. या प्रकल्पाला स्थानिक उमेदवारांकडून नेहमीच विरोध केला जात आहे. या अगोदरही नक्षलवादी संघटनेकडून सुरजागड लोकांनी प्रकल्पाला विरोध करून नक्षलवाद्यांकडून जवळपास 80 वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती.

त्यातच आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांनी धमकी दिल्याने नक्षलवाद विरोधात प्रशासन असा पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. त्यामुळे ऐन ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये हे धमकी प्रकरण आणखी चर्चेला आले आहे.

गेल्या 5 वर्षांपासून सुरु असलेलेल्या लोह खनिज प्रकल्पाच्या उत्खनानाचा वाद आता ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात प्रचंड टोकाला गेल्याचे चित्र समोर आले आहे. आता पुन्हा सुरजागडच्या विरोधात नक्षलवादी सक्रिय झालेले असल्याने हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सुरजागड लोह खनिज प्रकल्पाच्या उत्खननामुळे लोकप्रतिनिधी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाली आहे. सुरजागड लोह खनिज प्रकल्प बंद करा अन्यथा आम्ही वेगळ्या स्वरुपाने बंद करण्यची थेट धमकी आमदार आणि प्रशासनाला त्यांनी दिली आहे.

या प्रकल्पाच्या उत्खननामुळे जल,जंगल, जमीन व नैसर्गिक संपत्तीचे नुकसान होत असून त्याचा फटका येथील नागरिकांना बसत आहे. त्यामुळे हे काम ताबोडतोब थांबवण्याची धमकीच देण्यात आली आहे. या धमकीचे थेट पत्रच काढण्यात आल्याने हा वाद प्रचंड चर्चेला आला आहे.

भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी पश्चिम झोन कमिटीच्या श्रीनिवास नामक नक्षलवाद्यांनी थेट प्रेस नोट काढून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाविरोधात त्यांनी टीका केली आहे. सुरजागड लोह खनिज प्रकल्पाला गेल्या पाच वर्षापासून विरोध होत आहे.

या प्रकरणाला विरोध म्हणूननक्षलवादी संघटनेकडून सुरजागड लोकांनी प्रकल्पाच्या विरोध करून जवळपास 80 वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. आता पुन्हा सुरजागडच्या विरोधात नक्षलवादी सक्रिय झालेले असल्याने या वादाकडे येथील प्रशासन आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.