युरोपातून बियाणे, डोंबिवलीत सेटअप, ड्रग्ज बनवणारी हायटेक फॅक्टरी NCB कडून उद्ध्वस्त

एनसीबीने एक किलो हायड्रोफोनिक वीड जप्त केलं आहे, ज्याची मार्केटमध्ये किंमत 80 लाख रुपयांच्या घरात आहे (NCB hydroponic marijuana Dombivali)

युरोपातून बियाणे, डोंबिवलीत सेटअप, ड्रग्ज बनवणारी हायटेक फॅक्टरी NCB कडून उद्ध्वस्त
NCB कडून हायटेक ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 4:27 PM

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) ठाण्यात ड्रग्ज बनवण्याची हायटेक फॅक्टरी उद्ध्वस्त केली आहे. घरातच हायड्रोफोनिक वीड बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला. युरोपमधून बियाणे आणून डोंबिवलीत त्याचा सेटअप उभारण्यात आला होता. भारतामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे ड्रग्स तयार केले जात असल्याचे समोर आले आहे. (NCB busts hydroponic marijuana cultivation in Dombivali Palava City)

हायड्रोफोनिक वीड बनवण्यासाठी लागणारी बियाणे युरोपमधील नेदरर्लंड्सची राजधानी ॲमस्टरडॅमहून आणली जात होती. त्याचबरोबर हा ड्रग्ज बनवण्यासाठीचा सर्व सेटअप डोंबिवलीतील पलावा सिटी या ठिकाणी करण्यात आला होता. या प्रकरणात दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय एका नायजेरियन नागरिकाचाही यात समावेश असून त्यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

भारतात पहिल्यांदाच हायटेक ड्रग्ज फॅक्टरी उघड

एनसीबीने एक किलो हायड्रोफोनिक वीड जप्त केलं आहे, ज्याची मार्केटमध्ये किंमत 80 लाख रुपयांच्या घरात आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे अशा प्रकारचे ड्रग बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या मातीचा वापर न करता आधुनिक पद्धतीने बनवण्यात येत होते. भारतात पहिल्यांदाच अशाप्रकारचे ड्रग्ज बनवणारे रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणात अधिक तपास मुंबई नार्कोटिक्स टीमच्या अधिकाऱ्यांमार्फत सुरु आहे.

विरारमध्ये टॅटूच्या दुकानात ड्रग्ज तस्करी

टॅटू काढण्याच्या नावाखाली अंमली पदार्थांचा व्यवसाय करणारा ड्रग्ज पेडलर नुकताच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या हाती लागला होता. आरोपी रोहित वाघेला आपल्या ग्राहकांशी फक्त 30 सेकंदच बोलत असे. विरारमध्ये आपल्याच दुकानात ड्रग्जचा व्यवसाय रोहित करत होता. आरोपी रोहित वाघेला आपल्य्या घरात रेव्ह पार्टीचं आयोजनही करत असल्याची माहिती मिळाली आहे.

विरारमध्ये टॅटू काढण्याच्या दुकानात रोहित एमडी, एलएसडी आणि कोकेन यासारखी ड्रग्ज तो आलेल्या ग्राहकांना पुरवत होता. रोहित आपल्या ग्राहकांसोबत ड्रग्सच्या कोड वर्डमध्ये बोलत असे. आपल्या ग्राहकांशीही तो फक्त 30 सेकंदच बोलायचा, जेणेकरुन कोणीही त्याला शोधू शकणार नाही.

सुशांतसिंग संबंधी ड्रग्ज प्रकरणाचे धागे दुबईपर्यंत

दुसरीकडे, बहुचर्चित सुशांत सिंग राजपूतशी संबंधित ड्रग्ज प्रकरणाचं (Sushant Singh Rajput Drugs Case) दुबई कनेक्शन उघडकीस आलं आहे. जवळपास 6 ते 7 महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर मुख्य संशयित आरोपीची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ओळख पटवली आहे. हा आरोपी साहिल शाह ऊर्फ फ्लाको (Sahil Shah alias Flacko) दुबईत लपून बसला आहे. धक्कादायक म्हणजे अटकेतील दोन ड्रग्ज पेडलरपैकी एक जण DYSP म्हणजे पोलिस उपअधीक्षक होण्यासाठी तयारी करत होता. (NCB busts hydroponic marijuana cultivation in Dombivali’s Palava City)

संबंधित बातम्या 

सुशांतसिंग संबंधी ड्रग्ज प्रकरण, अटकेतील ड्रग पेडलरची पोलिस उपअधीक्षक होण्यासाठी तयारी

ग्राहकाशी केवळ 30 सेकंदच बातचित, टॅटूच्या नावाखाली ड्रग्ज विक्री, विरारचा तरुण NCB च्या ताब्यात

(NCB busts hydroponic marijuana cultivation in Dombivali Palava City)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.