Sameer Wankhede | मोठी बातमी ! समीर वानखेडेंना मुंबई पोलिसांचं समन्स, हेरगिरीप्रकरणात चौकशी होणार

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई पोलीस समन्स पाठवणार असल्याची माहिती मिळतेय. काही दिवसांपुर्वी खुद्द समीर वानखेडे यांनीच राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे आपल्यावर काही पोलीस पाळत ठेवत असल्याचा आरोप केला होता.

Sameer Wankhede | मोठी बातमी ! समीर वानखेडेंना मुंबई पोलिसांचं समन्स, हेरगिरीप्रकरणात चौकशी होणार
Sameer Wankhede
Follow us
| Updated on: Oct 14, 2021 | 6:53 PM

मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई पोलीस समन्स पाठवणार असल्याची माहिती मिळतेय. काही दिवसांपुर्वी खुद्द समीर वानखेडे यांनीच राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे आपल्यावर काही पोलीस पाळत ठेवत असल्याचा आरोप केला होता. त्याच तक्रारीनंतर समीर वानखेडे यांना समन्स पाठवले जाणार आहेत. त्याच तक्रारीचा भाग म्हणून समीर वानखेडेंची चौकशी केली जाईल.

मुंबई पोलीस वानखेडे यांना समन्स जारी करणार

मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी 11 ऑक्टोबर रोजी माझी पाळत ठेवली जात असल्याचा दावा केला होता. त्यांनी याबाबत मुंबई पोलिसात याबाबत तक्रारदेखील केली होती. तसेच मुंबई पोलिसांनी याबाबतचे सीसीटीव्ही फुटेजे देखील मिळाल्याची माहिती वानखेडे यांनी दिली होती. वानखेडे यांनी स्वत: त्याबाबतचे पुरावे पोलिसांना दिलेले आहेत. या सर्व प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी दोन पोलिसांची चौकशीदेखील केली आहे. तसेच आता मुंबई पोलीस वानखेडे यांना समन्स पाठवणार आहे. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार मुंबई पोलीस चौकशी करणार असल्याची माहिती आहे.

नवाब मलिकांच्या आरोपांनंतर आता समीर वानखेडेंवर पाळत?

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईवर राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी टीका केली होती. यावेळी त्यांनी समीर वानखेडे यांच्यांवरही टीका केली होती. एनसीबीने भाजपच्या नेत्यांसोबत मिळून शाहरुख खानला टार्गेट केलं, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला होता. तसेच त्यांनी एनसीबीने ज्या दिवशी क्रूझ पार्टीवर कारवाई केली त्यादिवशी काही भाजप नेतेही त्यांच्यासोबत होते, असा दावा मलिक यांनी केला होता. तसेच त्यांनी पत्रकार परिषदेत काही व्हिडीओ देखील दाखवत त्याचे पुरावे दिले होते. त्यामुळेच वानखेडेंवर पाळत ठेवली जातेय का? असा प्रश्न उपस्थित केला गेला होता. त्यानंतर समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसाता याबाबत तक्रारदेखील दाखल केली होती.

पाळत ठेवणाऱ्यांपैकी एक व्यक्ती मुंबई पोलीस दलातील अधिकारी असल्याचा दावा

समीर वानखेडे यांच्या आईचं ज्या स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला त्या स्मशानभूमीत ते नेहमी जातात. ते 2015 पासून तिथे जातात. या दरम्यान दोन संशयित व्यक्ती त्यांचा पाठलाग करत असल्याचं त्यांना सोमवारी (11 ऑक्टोबर) जाणवलं होतं. विशेष म्हणजे त्यांनी पाठलाग करणाऱ्यांचे सीसीटीव्ही फुटेजही काढले होते. त्यानंतर मुबंई पोलिसात तक्रार करत त्याचे सीसीटीव्ही फुटेज देत आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा त्यांनीक केला होता.

पोलिसाकडून अद्याप अधिकृत माहिती नाही

दरम्यान, वानखेडे यांच्या तक्रारीची दाखल घेत वरिष्ठ पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडून या संदर्भातील चौकशी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे वानखेडे यांचे या प्रकरणाबाबत काय मत आहे ? त्यांना काय गोष्टी जाणवल्या ? या सर्व गोष्टींची माहिती घेण्याचा विचार मुंबई पोलिसांचा आहे. वानखेडे यांना समन्स बजावले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेलीअसून पोलिसांनी तसे अधिकृतपणे जाहीर केलेले नाही.

इतर बातम्या :

Aryan Khan Bail | आर्यन खानचा मुक्काम कोठडीतच ! न्यायालयाने निकाल राखून ठेवला, 20 ऑक्टोबरला निर्णय

आर्यन खानचा जेलचा मुक्काम का वाढतोय? कोर्टात आज काय-काय घडलं?

… तर शिवसेनेचे 56 आमदार भाजपसोबत दिसले असते; गुलाबराव पाटलांचा चंद्रकांतदादांना टोला

(NCB zonal director Sameer Wankhede summoned by Mumbai Police will be interrogated in espionage case)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.