धनगर समाजाला आमच्यात आरक्षण देऊ नये – नरहरी झिरवळ

धनगर समाजाने आदिवासींच्या आरक्षणातून आरक्षण मागितलं आहे. त्याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी विरोध केला आहे.

धनगर समाजाला आमच्यात आरक्षण देऊ नये - नरहरी झिरवळ
धनगर समाजाला आमच्यात आरक्षण देऊ नये अशी भूमिका नरहरी झिरवळ यांनी घेतली आहे.
Follow us
| Updated on: Sep 30, 2024 | 10:31 AM

राज्यात मराठा आणि ओबीसींचा आरक्षणावरून वाद सुरू असतानाच आता आणखी एक नवा वाद निर्माण झाला आहे. धनगर समाजाने आदिवासींच्या आरक्षणातून आरक्षण मागितलं आहे. त्याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी विरोध केला आहे. धनगर समाजाला आमच्यात आरक्षण देऊ नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. टाटा इन्स्टिट्यूट ने जो अहवाल तयार केला आहे तो सरकार का प्रसिद्ध करत नाहीत? आणि इतर कमिटी नेमून त्यात काय करणार? असा सवाल त्यांनी विचारला आहे.

काय म्हणाले नरहरी झिरवळ ?

आम्ही आदिवासी आहोत, आम्हाला आदिवासी समाजातूनच आरक्षण द्या अशी मागणी धनगर समाजतर्फे केली जात आहे. धनगर आणि धनगड, असा शब्दांचा अपभ्रंश केला जातो. त्या माध्यमातून आम्हाला आदिवासीमध्ये घेतलं पाहिजे, अशी मागणी होती. पण ते आमच्यातले नाहीतच, असं आमचं मत अशी भूमिका झिरवळ यांनी मांडली. धनगर समाजाला एसटी प्रवगार्तून आरक्षण देण्याचा जीआर काढू नका असेही त्यांनी नमूद केले.  झिरवळ यांच्या या विरोधामुळे आता मराठा-ओबीसी वादानंतर धनगर-आदिवासी वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खूप दिवसांपासून आमची मागणी आहे की,सरकारला की पेसा भरती ही कायदा लागू झाला पाहिजे. पण या प्रकरणात आत्ता सरकार स्वतः कोर्टात गेलं आहे. त्यामुळे आमच्यामध्ये आणि आदिवासी मुलांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे . त्यामुळे या प्रकरणातील सुनावणीही होत नाही. पेसा कायदा हा लागू न करता या मुलांची भरती करा ना या मागणीसाठी आम्ही आज धरणे आंदोलन करत आहोत, असे त्यांनी नमूद केलं.

धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर मुंबईचं पाणी बंद करू, लहामटे यांनी दिला होता इशारा

यापूर्वीही अजित पवार गटाचे नेते किरण लहामटे यांनी या मुद्यावरून आक्रमक भूमिका मांडली होती.  धनगर आरक्षणाचा जीआर काढला तर आम्ही मुंबईचं पाणी बंद करू असा थेट इशारा लहामटे यांनी दिला आहे.  जर धनगरांसाठीचा जीआर काढला, जर शासनाने धनगर समाजाला आदिवासी कोट्यातून आरक्षण देण्याच्या संदर्भात पाऊल उचललं तर आम्ही सर्व आदिवासी समाजातील अमदार आणि खासदार आक्रमक पवित्रा घेऊ ,अशी भूमिका त्यांनी मांडली. आत्तापर्यंत आदिवासांनी एवढा त्याग केला आहे, जर तुम्ही आमच्या बोकांडी बसाल तर आम्ही मुंबईचं पाणी बंद करू, तिथे जोडणारे जे रस्ते आहेत ते थांबवू, रेल्वेचे रूळ उखडून टाकू असा थेट इशारा लहामटे यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.

जरांगेंची मोठी घोषणा; नारायण गडावर दसऱ्याच्या दिवशी मी भक्त म्हणून...
जरांगेंची मोठी घोषणा; नारायण गडावर दसऱ्याच्या दिवशी मी भक्त म्हणून....
दादांच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला दिली निपटविण्याची धमकी, ऐका ऑडिओ
दादांच्या आमदाराने महिला अधिकाऱ्याला दिली निपटविण्याची धमकी, ऐका ऑडिओ.
'शासनाच्या भरोशावर राहू नका, शासन विषकन्या असते'; गडकरी काय म्हणाले?
'शासनाच्या भरोशावर राहू नका, शासन विषकन्या असते'; गडकरी काय म्हणाले?.
'हिंदू अंत करतील, वाकड्या नजरेनं...', नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य
'हिंदू अंत करतील, वाकड्या नजरेनं...', नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य.
पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा...दानवेंची सरकारवर टीका
पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा...दानवेंची सरकारवर टीका.
सरकारच्या योजनांमुळे सरकारची तिजोरी संकटात? वित्तविभागाला फुटला घाम?
सरकारच्या योजनांमुळे सरकारची तिजोरी संकटात? वित्तविभागाला फुटला घाम?.
एन्काऊंटर स्टोरीत प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानं ट्विस्ट, ऑडिओमध्ये काय?
एन्काऊंटर स्टोरीत प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानं ट्विस्ट, ऑडिओमध्ये काय?.
मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत; सर्जा, सोन्या नामंकित बैल जोड्यांचा थरार
मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत; सर्जा, सोन्या नामंकित बैल जोड्यांचा थरार.
ठाकरेंनी भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, कोणी लगावला खोचक टोला?
ठाकरेंनी भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, कोणी लगावला खोचक टोला?.
'तर पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का?' शिंदे नेमकं काय म्हणाले?
'तर पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का?' शिंदे नेमकं काय म्हणाले?.