शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात संयुक्त तांत्रिक समिती; तर सत्ताधारी पक्षाचंच आंदोलन, राजकोट किल्ल्यावर मोठा पोलीस बंदोबस्त

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed in Malvan : शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात संयुक्त तांत्रिक समिती नेमण्यात येणार आहे. तर सत्ताधारी पक्षच या पुतळा कोसळण्याप्रकरणी आंदोलन करणार आहे. या काल झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर राजकोट किल्ल्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात संयुक्त तांत्रिक समिती; तर सत्ताधारी पक्षाचंच आंदोलन, राजकोट किल्ल्यावर मोठा पोलीस बंदोबस्त
Follow us
| Updated on: Aug 29, 2024 | 8:27 AM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर असणारा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उद्घाटनानंतर आठच महिन्यात कोसळला. त्यानंतर आता शिवप्रेमी आणि विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठिकठिकाणी शिंदे सरकारच्या विरोधात आंदोलनं केली जात आहेत. अशातच आता राज्य सरकार एक समिती नेमणार आहे. नौदल आणि राज्य सरकारची संयुक्त तांत्रिक समिती नेमणार आहेत. नवीन पुतळा उभारण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात सूचना दिल्या आहेत. लवकरच त्या ठिकाणी दुसरा पुतळा बसवण्यात येणार आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

अजित पवार गटाचं आंदोलन

मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सत्ताधारी पक्षाकडूनच आंदोलन केलं जाणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट राजकोट किल्ल्यावर जात मूक आंदोलन करणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी याबाबत पत्र काढलं आहे. त्यामुळे काल महाविकास आघाडीने आंदोलन केल्यानंतर आता आज सरकारमध्ये सहभागी असणारा सत्ताधारी पक्षच आंदोलन करणार आहे. या आंदोलनावेळी काय घडतं? हे पाहावं लागेल.

राजकोट किल्ल्यावर काल राडा

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. काल महाविकास आघाडीचे नेते राजकोट किल्ल्यावर पोहोचले होते. यावेळी आदित्य ठाकरे आणि ठाकरे गट यांच्यात राडा झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला ही काय पहायला येण्याची गोष्ट आहे का? असं म्हणत नारायण राणे आक्रमक झाले. पण त्याच राजकोट किल्ल्यावर जात आम्हाला पाहणी करायचीय असंही राणे म्हणत होते. यावेळी राजकोट किल्ला परिसरात प्रचंड गोंधळाचं वातावरण होतं.

राजकोट किल्ल्यावर पोलीस बंदोबस्त

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर काल ठाकरे गटाचे कार्यकर्ते विरूद्ध राणे समर्थक यांच्यात राडा झाला. त्यानंतर राजकोट किल्ल्यावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ झाली आहे. सिंधुदुर्ग पोलीस मुख्यालयाचे 30 पोलीस कर्मचारी राजकोट किल्ल्यावर बंदोबस्तसाठी आहेत. काल रात्रीपासून राजकोट किल्ल्यावरील सुरक्षा वाढवली आहे. आता 24 तास राजकोट किल्ल्यावर पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.

विधानसभेसाठी महायुतीचे पहिले 100 उमेदवार निश्चित, दादांच्या यादीत कोण?
विधानसभेसाठी महायुतीचे पहिले 100 उमेदवार निश्चित, दादांच्या यादीत कोण?.
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.