दोन दिवसांपासून नॉट रिचेबल, तिसऱ्या दिवशी अजितदादा प्रकटले, पडद्यामागे काय घडलं?
महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे नॉट रिचेबल झाले होते. अखेर आता अजित पवार दोन दिवस गायब का होते, याची माहिती समोर आली आहे.
Ajit Pawar Throat Infection : राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारात 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे नॉट रिचेबल झाले होते. अखेर आता अजित पवार दोन दिवस गायब का होते, याची माहिती समोर आली आहे. यामुळे अनेक कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
अजित पवारांच्या अनुपस्थितीच कारण समोर
अजित पवार हे आज विधिमंडळ कामकाजात सहभागी होणार आहेत. अजित पवारांना घशाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे ते दोन दिवस आराम करत होते. यामुळे ते अधिवेशनात अनुपस्थित होते. मात्र आता त्यांची प्रकृती सुधारली आहे. त्यामुळे आता दोन दिवसांनी अजित पवार हे विधिमंडळात दाखल होणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या बंगल्यावर भेटण्यासाठी अंसख्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळत आहे.
अजित पवार यांना घशाचे इन्फेक्शन
अजित पवारांच्या नागपुरातील निवासस्थानी अनेक कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. अजित पवारांनी या सर्वांची भेट घेतली. त्यानंतर ते आज विधिमंडळ कामकाजात सहभागी होणार आहेत. गेले दोन दिवस अजित पवार हे नॉट रिचेबल होते, पण आज ते कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. अजित पवार यांना घशाचे इन्फेक्शन झाले होते. त्यामुळे त्यांनी शासकीय निवासस्थानी आराम केला, अशी माहिती पक्षाकडून देण्यात येत आहे.
पण आजपासून अजित पवार हे पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाले आहेत. आज अजित पवार यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्ते आणि नेतेमंडळी आले आहेत. शशिकांत शिंदे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, राजकुमार बडोले, साहसराम कोराटे या नेतेमंडळींनी अजित पवारांची भेट घेतली.
अजित दादा नागपुरला होते, दिल्लीला गेले नाहीत
अजित पवारांना नेमकं काय झालं होतं, याबद्दल आमदार सुनील तटकरेंनी भाष्य केले. कल्पोकल्पित आणि निराधार आहे. केवळ तब्येतीच्या कारणामुळे अजितदादा भेटले नाही. ते नागपूरलाच होते. ते दिल्लीला आले नाही. ते नागपूरलाच घरी आराम करत होते. तब्येतीच्या कारणामुळे ते विधानसभेत आले नाही. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री अर्थ खात्याचं ठरवतील. खातेवाटपात कोणतीही नाराजी नाही, असे सुनील तटकरे यावेळी म्हणाले.