अनिल देशमुख यांना मोठा दिलासा, ‘ती’ याचिका फेटाळली, जेलबाहेर येण्याचा मार्ग मोकळा…
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळालाय.
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh Bail) यांना मोठा दिलासा मिळालाय. अनिल देशमुख यांच्या जामीनाला स्थगिती देण्याबाबत सीबीआयने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सीबीआयची (CBI) ही याचिका मुंबई हायकोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांचा जेलबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालाय.
सीबीआयची ‘ती’ याचिका फेटाळली
अनिल देशमुख यांना मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी सीबीआयने याचिका दाखल केली होती. ती याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
सीबीआयच्या या याचिकेला अनिल देशमुखांतर्फे अॅड. अनिकेत निकम यांनी विरोध केला. अनिल देशमुखांना जामीन मिळण्याच्या मुद्द्यावर त्यांनी बाजू मांडली आज अखेर सीबीआयचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. त्यामुळे देशमुखांना दिलासा मिळाला आहे.
जामीन कधी?
अनिल देशमुख यांचा जेलबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झालाय. त्यामुळे सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देशमुख जेलबाहेर येतील. उद्या त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने 12 डिसेंबर रोजी सीबीआय प्रकरणात अनिल देशमुख यांना जामिन मंजूर केला होता. मात्र सीबीआयला सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी 10 दिवसांची मुद्दत देत जामिनावर स्थगिती दिली होती. मात्र त्यानंतर 21 डिसेंबरला पुन्हा जामीन आदेशावर स्थगिती वाढवून 27 डिसेंबरपर्यंत दिली गेली होती. त्यावेळी न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांनी सीबीआयला सांगितलं होतं की, यापुढे स्थगिती मुद्दत वाढवून दिली जाणार नाही.
अनिकेत देशमुख म्हणाले…
या केसविषयी देशमुखांचे वकील अनिकेत देशमुख यांनी माहिती दिली. सुप्रीम कोर्टला सुट्टी आहे. त्यामुळे 4 दिवस उशीरा सीबीआय सुप्रीम कोर्टत गेलं. यामुळे देशमुख प्रकरणी याचिकेवर सुप्रीम कोर्टात अद्याप सुनावणी सुरू होऊ शकली नाही. हायकोर्टने आधीच्या निर्णयात म्हटले होते की कोणत्याही परिस्थितीत परत याप्रकरणी स्थगिती दिली जाणार नाही. तसंच होताना दिसत आहे, असं अनिकेत निकम म्हणालेत.
देशमुख कुटुंब आनंदात
अनिल देशमुख बाहेर येणार त्यामुळे राऊत कुटुंबियांमध्येसुद्धा आनंदाचं वातावरण आहे. राष्ट्रवादीचे नेतेही खुश आहेत. आम्ही त्यांना महाविकास आघाडीचे नेते म्हणून भेटायला जाणार आहोत. त्यांच्या कुटुंबानी खूप त्रास सहन केवा असेल. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना ईडी, सीबीआय, इनकम टँक्स लावली जाते. पण संजय राऊत बाहेर आले आता अनिल देशमुखही येतील, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.