राष्ट्रवादीकडून उस्मानाबाद आणि माढ्याचा उमेदवार अखेर जाहीर

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा आणि उस्मानाबादचा उमेदवार अखेर जाहीर केला आहे. सोलापूरचे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे माढ्यातून, तर माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांना उस्मानाबादची उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून याअगोदर एकूण 16 उमेदवार जाहीर करण्यात आले होते. आता या दोन उमेदवारांसह राष्ट्रवादीचे […]

राष्ट्रवादीकडून उस्मानाबाद आणि माढ्याचा उमेदवार अखेर जाहीर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा आणि उस्मानाबादचा उमेदवार अखेर जाहीर केला आहे. सोलापूरचे विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे माढ्यातून, तर माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांना उस्मानाबादची उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादीकडून याअगोदर एकूण 16 उमेदवार जाहीर करण्यात आले होते. आता या दोन उमेदवारांसह राष्ट्रवादीचे एकूण 18 उमेदवार जाहीर झाले आहेत. काँग्रेससोबतच्या आघाडीमध्ये राष्ट्रवादी 22 जागा लढणार आहे.

बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या सभेत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. उस्मानाबाद लोकसभेसाठी डॉ. पद्मसिंह पाटील यांचा मुलगा आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि सून अर्चना पाटील यापैकी एक संभाव्य उमेदवार अशी चर्चा सुरु होती. अखेर पुन्हा एकदा पाटील घराण्यातला उमेदवार देण्यात आला आहे. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी तीन दिवसांपूर्वीच उमेदवारी अर्जही घेऊन ठेवला होता. पण त्यांच्याऐवजी मुलाला संधी देण्यात आली आहे.

कोण आहेत संजय शिंदे?

संजय शिंदे हे सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती. भाजपसह इतर सहयोगी पक्षाचा शिंदेंना पाठिंबा आहे.

संजय शिंदे हे मोहिते पाटील कुटुंबीयांचे कट्टर विरोधक असून, अजित पवारांचे कट्टर समर्थक आहेत. तसेच, संजय शिंदे हे माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे बंधू असून, माढा तालुक्यातील निमगाव येथील सरपंच पदापासून आपल्या राजकारणाची सुरवात केली आहे. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष राहिले आहेत.

वाचा – उस्मानाबादेत शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, युवासेनेचे नेते ओमराजेंना उमेदवारी

2014 साली स्वाभिमानी पक्षाकडून करमाळा विधानसभा मतदार संघातून संजय शिंदे यांनी निवडणूक लढवली होती.

संजय शिंदे हे विठ्ठल कार्पोरेशनचे संस्थापक चेअरमन असून, या माध्यमातून साखर कारखाना आणि सूतगिरणीची माढा तालुक्यातील म्हैसगाव येथे उभारणी त्यांनी केली. माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन पदही त्यांनी सांभाळलं आहे.

याआधी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद, तसेच माढा तालुका पंचायत समितीचे सभापतीपदही संजय शिंदे यांनी भूषवले आहे.

कोण आहेत राणा जगजित सिंह पाटील?

पाटील यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील हे उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून ते राष्ट्रवादीचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्षही आहेत. तर डॉ पाटील यांच्या सून अर्चनाताई पाटील या उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा आहेत. त्यामुळे हा या परिवाराचा बालेकिल्ला आहे. डॉ पाटील यांच्यावर विरोधक राजकीय घराणेशाहीचा आरोप करीत असले तरी त्यांच्यामागे जनाधार असल्याने याचा परिणाम होताना दिसत नाही.

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.