sharad pawar on bjp: हुतात्म्यांवर टीका करणाऱ्यांच्या हाती देशाचं नेतृत्व, शरद पवार यांची घणाघाती टीका
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर (central government) घणाघाती टीका केली आहे. आज देशाचं राजकारण वेगळ्या दिशेला जात आहे.
शंकर देवकुळे, शिराळा: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर (central government) घणाघाती टीका केली आहे. आज देशाचं राजकारण वेगळ्या दिशेला जात आहे. तर राज्य सरकार वेगळ्या विचारानं काम करत आहे. आजपर्यंत माणसं जोडण्याचं काम झालं. पण आज धर्माच्या नावाने अंधकार पसरवण्याचं काम सुरू आहे. देशासाठी जे हुतात्मा झाले त्यांच्यावर टीका करणारे नेतृत्व देशात बघायला मिळतंय. त्यामुळे देशात अस्वस्थता आहे, असं सांगतानाच आपल्याला आता धर्मांध शक्तींविरोधात काम करावं लागणार आहे. विकासात्मक राजकारणाची या देशाला गरज आहे. राजकारण सुद्धा सर्वसामान्यांना न्याय देणारं हवं, असं शरद पवार यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून राज्याचा विकास होत असल्याचंही ते म्हणाले.
शरद पवार हे शिराळा येथे बोलत होते. शरद पवार यांच्या उपस्थितीत माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी शरद पवार यांनी केंद्र सरकारवर घणाघाती हल्ला केला. नव्या वर्षाची आज सुरुवात होत आहे. नाईक यांनी पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्रातील राष्ट्रवादीला हातभार लावण्याचा निर्णय ज्यांनी घेतला त्यांच स्वागत आज आपण करतोय. योग्य असेल तर स्वागत करणार. नसेल तर पडेल ती किंमत मोजणार असा हा जिल्हा आहे. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा इतिहास शिराळा शिवाय पूर्ण होत नाही. शिवाजीराव जिल्हा परिषदेचे यशस्वी अध्यक्ष राहिले आहेत. आज ते पुन्हा घरी येताहेत. घराचं रक्षण करण्याचं सूत्रं त्यांनी स्वीकारलंय. त्यांचं मी स्वागत करतो. नाईक यांच्या अनुभवाचा उपयोग राज्य पातळीवर कसा करून घेता येईल याचा विचार झाला पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.
आता साखर एके साखर चालणार नाही
येत्या चार पाच वर्षात या भागात पाण्यासाठी तहानलेल गाव पाहायला मिळणार नाही. उसाच क्षेत्र वाढतंय. मला काळजी आहे यांचा गळीत कसा होणार. मी आता माहिती घेतली, 90 पेक्षा जास्त कारखाने जून महिन्या पर्यंत चालू राहतील अशी स्थिती आहे, असंही त्यांनी सांगितलं. साखर एके साखर आता चालणार नाही. ब्राझील, अमेरिकेमध्ये इथेनॉलचा वापर वाढतोय. आपल्या पंतप्रधानांनीही त्याला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतलीय, असही त्यांनी स्पष्ट केलं.
मावशीच्या गावाला आल्याचा आनंद
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांनीही जोरदार भाषण केलं. शिवाजीराव आमच्या सोबतच होते. जरा जाऊन येतो म्हणाले आणि गेले. आता परत आले. आंनद आहे. आज मावशीच्या गावाला आल्याचा आनंद मला झालाय. मानसिंगराव माझ्याकडे आले म्हणाले शिवाजीरावांचं आणि आमचं मिटलं मी म्हटलं वाकड कधी होतं. त्या नंतर दोघेही थेट सिल्व्हर ओकवर आले. सिल्व्हर ओकच्या झाडाचा सर्वांना आधार आहे, असं पाटील यांनी म्हणताच एकच खसखस पिकली.
संबंधित बातम्या:
विद्यावाचस्पती नको, डॉक्टरच शब्द ठीक आहे, मराठी भाषा भवनाच्या कार्यक्रमात Ajit Pawar यांची टोलेबाजी