मंत्रिमंडळात कोण असणार? मुख्यमंत्रिपद कोणाला? शरद पवारांनी दिली सर्व प्रश्नांची उत्तर

आम्हाला लोकांना विश्वास द्यायचा आहे की, आम्ही राज्याच्या हिताची जपणूक करणारा पर्याय तुम्हाला देऊ आणि त्या पर्यायाचा कार्यक्रम लोकांसमोर देतो.

मंत्रिमंडळात कोण असणार? मुख्यमंत्रिपद कोणाला? शरद पवारांनी दिली सर्व प्रश्नांची उत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या चिपळू दौऱ्यावर आहेत.
Follow us
| Updated on: Sep 23, 2024 | 12:47 PM

आम्हाला लोकांना विश्वास द्यायचा आहे की, आम्ही राज्याच्या हिताची जपणूक करणारा पर्याय तुम्हाला देतो आणि त्या पर्यायाचा कार्यक्रम लोकांसमोर देतो. निवडणुकीत लोकांची शक्ती, पाठिंबा मिळाल्यानंतर मग मंत्रीमंडळात कोणाला घ्यायचं, काय पद द्यायचं या गोष्टी ठरवता येतील, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण  हे स्पष्टपणे सांगणं टाळलं. शरद पवार सध्या चिपळू दौऱ्यावर आहेत.

देशामध्ये जयप्रकाश यांच्या सूचनेने समविचारी लोक सगळे एकत्र आले, पक्ष नंतर स्थापला. निवडणुकीला सामोरे गेले, लोकांनी शक्ती दिली , निवडून दिलं. आणि निवडून आल्यानंतर जनता पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर मोरारजी देसाई यांची निवड केली . ज्यावेळी ते लोकांकडे मत मागायला जात होते, त्यावेळी मोरारजी देसाई हे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत हे काही लोकांना सांगितलं नव्हतं, तरीही लोकांनी शक्ती दिली, ते पंतप्रधान झाले, देश चालवला असा किस्सा शरद पवार यांनी सांगितला.

मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून सस्पेन्स कायम 

विधानसभा निवडणुकांची अवघ्या काही दिवसांतच घोषणा होऊ शकते. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघांनीही कंबर कसून ततयारी सुरू केली आहे. महायुती सरकार आणि महाविकास आघाडी दोघांनीही निवडणुकीसाठी जय्यत सुरू केली असली तरी सत्ता मिळाल्यावर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. दोघांनीही अजून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलेला नसून त्यावरून अनेक चर्चा सुरू आहेत,अंदाज बांधले जात आहेत. मविआनं मुख्यमंत्रिपदाचा चेहरा घोषित करावा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी केली होती. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने त्याबाबत काहीच उत्तर न दिल्याने मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे अजूनही अस्पष्ट आहे. त्यातच आजही शरद पवार यांनी मंत्रीमंडळात कोण असेल, मविआचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा यावर भाष्य करण्यास नकार दिला.

लोकांच्या भावनेशी कोणी खेळू नये

तिरुपती बालाजीच्या मंदिरात मिळणाऱ्या लांडूच्या प्रसादावरुन सध्या वाद रंगला आहे. त्यासंदर्भातही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ‘ ते लोकांच्या श्रद्धेचं ठिकाण आहे, अनेक भाविक तिथे श्रद्धेनं जात असतात. तिथे मिळणाऱ्या प्रसादामध्ये काही मिक्स केलेलं आहे, असं मी वाचलं. माझ्या हातात त्याची अधिकृत काही माहिती आलेली नाही. पण ते जर खरं असेल ते अतिशय चुकीच आहे. यासाठी जे कोणी जबाबादार असतील त्यांच्यावर सक्त कारवाई केली पाहिजे, कारण लोकांच्या भावनेशी कोणी खेळू नये, ‘ असं मत त्यांनी मांडलं.

'राजकारणात काहीही होऊ शकतं..', रविकांत तुपकरांनी काय केलं सूचक वक्तव्य
'राजकारणात काहीही होऊ शकतं..', रविकांत तुपकरांनी काय केलं सूचक वक्तव्य.
जलील यांची तिरंगा संविधान रॅली;रामगिरींसह राणेंबाबत केली ही मोठी मागणी
जलील यांची तिरंगा संविधान रॅली;रामगिरींसह राणेंबाबत केली ही मोठी मागणी.
'एकनाथ खडसे बदनाम गल्लीमधील...', कोणी केली जिव्हारी लागणारी टीका?
'एकनाथ खडसे बदनाम गल्लीमधील...', कोणी केली जिव्हारी लागणारी टीका?.
कसारा स्टेशनजवळ सिग्नलला एक्स्प्रेस थांबली अन् अचानक..; बघा काय झालं?
कसारा स्टेशनजवळ सिग्नलला एक्स्प्रेस थांबली अन् अचानक..; बघा काय झालं?.
चंद्रचूड-शिंदे एकाच मंचावर येणार, निमित्त काय? राजकीय वर्तुळात चर्चा
चंद्रचूड-शिंदे एकाच मंचावर येणार, निमित्त काय? राजकीय वर्तुळात चर्चा.
मंकीपॉक्स कसा पसरतो? तुम्ही कशी काळजी घ्या?
मंकीपॉक्स कसा पसरतो? तुम्ही कशी काळजी घ्या?.
खडसे नेमके कुणीकडे? ना BJPत प्रवेश झाला, ना NCP ने राजीनामा स्वीकारला?
खडसे नेमके कुणीकडे? ना BJPत प्रवेश झाला, ना NCP ने राजीनामा स्वीकारला?.
IC 814 कंदाहार हायजॅकची सत्यकथा; कशी झाली विमानातील प्रवाशांची सुटका?
IC 814 कंदाहार हायजॅकची सत्यकथा; कशी झाली विमानातील प्रवाशांची सुटका?.
जरांगे - लक्ष्मण हाकेंचं उपोषणस्थळ... वादाचं मोहोळ अन् आरोप-प्रत्यारोप
जरांगे - लक्ष्मण हाकेंचं उपोषणस्थळ... वादाचं मोहोळ अन् आरोप-प्रत्यारोप.
'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप.