तुमचाही निळा शर्ट, तुमच्याकडे महिला आकर्षित होतील काय?; गुलाबी जॅकेटवरून शरद पवार यांचा अजितदादांना टोला

मनोज जरांगे यांनी 288 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला उमेदवार उभे करण्याचा अधिकार आहे. निर्णय घ्यायचा अधिकार आहे. लोक उभे करायचा अधिकार आहे. कुणाला समर्थन द्यायचं? कुणाला विरोध करायचा यात काही चुकीचं नाही. माझाही पक्ष काही जागा लढवणार आहे. त्यात चुकीचं काय आहे?; असा सवाल शरद पवार यांनी केला.

तुमचाही निळा शर्ट, तुमच्याकडे महिला आकर्षित होतील काय?; गुलाबी जॅकेटवरून शरद पवार यांचा अजितदादांना टोला
Follow us
| Updated on: Aug 12, 2024 | 1:22 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या रोज गुलाबी जॅकेट घालत आहेत. गुलाबी रंग शुभ असल्याने विधानसभा निवडणुकीपर्यंत अजितदादा गुलाबी जॅकेट घालणार असल्याचं सांगितलं जात आहे. लाडकी बहीण योजना जाहीर केल्यानंतर अजित पवार यांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जात आहे. अजितदादांच्या या जॅकेटवरून माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी टोला लगावला आहे. तुम्ही निळा शर्ट घातला आहे. तुमच्याकडे महिला आकर्षित होणार आहे का?, असा खोचक टोला शरद पवार यांनी अजितदादा यांना नाव न घेता लावला.

शरद पवार हे पुण्यात मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांना अजित पवार यांच्या गुलाबी जॅकेटबाबत विचारण्यात आलं. तुम्ही निळा शर्ट घातलाय. त्यामुळे तुमच्याकडे महिलांचं आकर्षण होणार आहे काय काय संबंध?; असा टोला शरद पवार यांनी लगावला.

मोदींना टोला

यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. माझी इच्छा एकच आहे. विधानसभेची निवडणूक आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधानांनी 18 सभा घेतल्या होत्या. त्यातील 14 ठिकाणी आमचे उमेदवार निवडून आले. त्यांनी अधिक सभा घ्याव्यात. महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करावं. म्हणजे आम्ही स्थिर सरकार आम्ही महाराष्ट्राला देऊ, असा चिमटा शरद पवार यांनी काढला.

मतभेद नाहीत

मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत मतभेद असल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. अजिबात म्हणजे अजिबात नाही. आम्ही कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही. मीही कोणत्या स्पर्धेत नाही, असं शरद पवार म्हणाले.

मला माहिती नाही

मराठा, कुणबी आणि ओबीसी या वादामुळे मतांची विभागणी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याबाबतही शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर माझ्याकडे काही आधार नाही. त्याबाबतची मला माहिती नाही, असं ते म्हणाले.

तीन वर्षानंतर का जाग आली?

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपावरही त्यांनी भाष्य केलं. त्यांनी अत्यंत बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. त्यांचं वागणं, बोलणं पाहता सरकारने अॅक्शन घेतली पाहिजे. तीन वर्षानंतर त्यांना का जाग आली? ठिक आहे. निवृत्त अधिकारी आहेत. त्यांच्यावर बोलणं योग्य नाही. पुरावे द्यायचे तर द्या. आनंद आहे. त्यातून वेगळ्या गोष्टी बाहेर येतील, असं शरद पवार म्हणाले.

समितीचा निर्णय आल्यावर बोलू

वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकावरही त्यांनी भाष्य केलं. या कायद्याचा ड्राफ्ट आता माझ्या हातात आला आहे. सुप्रिया सुळेंनी पार्लमेंट सूचवलं की, यावर लगेच निर्णय घेऊ नये. सर्व पक्षीय समिती नेमावी. तशी ती कमिटी नेमली. या समितीसाठी आम्ही दोन नावे दिली होती. त्यातील एक नाव घेतलं आहे. सहा महिन्यानंतर कमिटीचा अहवाल येईल. त्यानंतर आम्ही बोलू, असं त्यांनी स्पष्ट केलं.

अजून चार निर्णय घेतील

लाडकी बहीण योजनेवरही शरद पवार यांनी खोचक टीका केली. राज्यकर्त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे नक्कीच काही विचार केला असेल. नक्कीच त्यांच्याकडे पुरेसे पैसे असतील. त्यातून करतील. सरकारडे बरीच शिल्लक रक्कम असेल. त्यामुळे ते अजून असे चार निर्णय घेतील, असा टोला त्यांनी लगावला.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.