Sharad Pawar : लाडकी बहीण योजनेचा सत्ताधाऱ्यांना किती फायदा?; शरद पवार यांच्या विधानाने आघाडीत खळबळ?
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसरीकडे स्त्रियांवर अत्याचार होत आहे. महिला गायब होत आहे. त्याचा काही परिणाम होईल ना...
सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांना लोकसभा निवडणुकीत जो फटका बसला, त्याची त्यांनी सीरिअस नोंद घेतली. लोकांना खूश करण्यासाठी त्यांनी लोकांना आनंदी ठेवणारी योजना आणली, लोकांना पैसे दिले. योजना किती दिवस टिकणार याची माहिती द्यायला हवी होती. आज निवडणुका काढायच्या ही त्यांची मानसिकता आहे. लाडकी बहीण योजनेतून महिन्याला पैसे देऊन त्यांनी महिलांना खुश केलं, पण त्याचा फार परिणाम होणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसरीकडे स्त्रियांवर अत्याचार होत आहे. महिला गायब होत आहे. त्याचा काही परिणाम होईल ना, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी टीकास्त्र सोडले.
अर्थसंकल्प मांडताना जुलै महिन्यात महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. त्याअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात. सरकारच्या या योजनेचा बराच बोलबाला झाला, अनेकांनी त्याचं कौतुक केलं. विरोधकांनी मात्र या योजनेवर कडाडून टीका करताना विधानसभा निवडणूक समोर ठेवून मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही योजना आणल्याचे टीकास्त्र सोडलं . विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानही लाडकी बहीण योजना चर्चेत असून महायुतीच्या नेत्यांकडून त्याचा वारंवार उल्लेख केला जातो. मात्र विरोधकांची विरोधी सूर अद्यापही कायम आहे.
याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनीही या योजनेबद्दल बोलताना लाडकी बहीण योजनेचा सत्ताधाऱ्यांना किती फायदा होईल यावर भाष्य केलं.
काय म्हणाले शरद पवार ?
सहा महिन्यांपूर्वीच्या निवडणुकीत आम्ही एकदम ३० वर गेलो. याचा अर्थ लोकांना मोदींची भूमिका पसंत नव्हती हे महाराष्ट्रात दिसत होतं. साताऱ्यातही आमची एक जागा आली असती. एकंदर चित्र गेल्या निवडणुकीप्रमाणे न बोलणारं आणि मतदानाच्या दिवशी रिअॅक्ट होणारं आहे.
आताची स्थिती वेगळी आहे. सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांना लोकसभा निवडणुकीचा जो फटका बसला, त्याची त्यांनी सीरिअस नोंदघेतली. लोकांना खूश करण्यासाठी त्यांनी लोकांना आनंदी ठेवणारी योजना आणली, लोकांना जास्तीत जास्त पैसे दिले. योजना किती दिवस टिकणार याची माहिती द्यायला हवी होती. पण त्यांनी दिली नाही. आज निवडणुका काढायच्या ही त्यांची मानसिकता आहे. उदा. लाडकी बहीण. दोन कोटी महिलांना १५०० रुपये दिले. त्यांना महिलांना खूश केलं. पण त्याचा परिणाम काही ना काही होईल. एवढे पैसे वाटले. पण फार परिणाम होणार नाही,असं शरद पवार म्हणाले.
एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसरीकडे स्त्रियांवरचे अत्याचार..
पत्रकार परिषेदत शरद पवार यांनी लाडकी बहीणवरून निशाणा साधला. एकीकडे त्यांनी( सरकारने) मदत केली. पण महिलांवर अत्याचार वाढले आहे. माझ्याकडे आकडेवारी आहे. दोन वर्षात ६७ हजार अत्याचार महिलांवर झाले. ही लहान गोष्ट झाली नाही. मुली किंवा स्त्रिया बेपत्ता होण्याची माहिती आहे. ६४ हजार महिला आणि मुली राज्यात बेपत्ता आहे. त्यात गृहमंत्री ज्या जिल्ह्यातील आहे,त्या नागपुरातील ही नोंद होत आहे. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसरीकडे स्त्रियांवर अत्याचार होत आहे. महिला गायब होत आहे. त्याचा काही परिणाम होईल ना, अशा शब्दांत शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं.
सरकारकडून सत्तेचा गैरवापर
दुसरा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. पीक हातातून जात आहे. काही भागात सोयाबीन आणि कापूस महत्त्वाचा आहे. त्याच्या किंमती जास्त आहे. त्यामुळे शेतकरी नाराज आहे. त्यांच्या आत्महत्या होत आहे. तिसरा प्रश्न आहे, तो म्हणजे शैक्षणिक संस्था वाढल्या. लोक शिकत आहे. संधी मिळत आहे. पण काम कुठे आहे. नोकरी नाही. रोजगार नाही. तरुणांसमोर प्रश्न आहे. त्यामुळे अनेक प्रश्न आहे. हे प्रश्न मांडणं आमचं काम आहे. दुसऱ्या बाजूला सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी ते पाऊल टाकत आहे, अशी टीका त्यांनी केली. त्याचा परिणाम किती होईल हे बघायचं आहे. राज्यात लोकांना परिवर्तन हवंय. लोक परिवर्तन करतील. महाविकास आघाडीच्या बाजूने लोक उभे राहतील, असा विश्वासही शरद पवार यांनी व्यक्त केला.