माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचा राष्ट्रवादीला रामराम

बापूसाहेब देशमुख गोरठेकर हे नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि तितकेच ताकदवान नेते आहेत. जुन्या पिढीतील शब्द पाळण्याचा त्यांचा (Bapusaheb Gorthekar) गुण आजही कायम आहे.

माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचा राष्ट्रवादीला रामराम
Follow us
| Updated on: Jul 29, 2019 | 4:29 PM

नांदेड : राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात लागलेल्या गळतीचं लोन नांदेडमध्येही पोहोचलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर (Bapusaheb Gorthekar) यांनी पक्षाला रामराम ठोकलाय. बापूसाहेब देशमुख गोरठेकर हे नांदेड जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि तितकेच ताकदवान नेते आहेत. जुन्या पिढीतील शब्द पाळण्याचा त्यांचा (Bapusaheb Gorthekar) गुण आजही कायम आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्या विलक्षण मोठी आहे. राष्ट्रवादी सोडल्यानंतर त्यांच्यासोबत कोणत्याही पक्षात जाण्यास समर्थक तयार आहेत. या सद्यस्थितीमुळे नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं भगदाड पडणार आहे.

माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांनी समर्थकांचा मेळावा घेतला. त्यात समर्थकांनी भाजपात जाण्यासाठी गोरठेकर यांना आग्रह केला. गोरठेकर यांनी विधानसभा निवडणूक भोकरमधून लढवावी असाही कार्यकर्त्यांनी आग्रह केलाय. विशेष म्हणजे भोकर हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. याच भोकरमध्ये गोरठेकर यांनी लढावं यासाठी समर्थकांनी आग्रह धरलाय.

या घडामोडीमुळे नांदेड जिल्ह्यात राजकीय उलथापालथ होणार आहे. गोरठेकर यांच्यासोबत अनेक प्रमुख नेते कार्यकर्ते देखील राष्ट्रवादी सोडणार आहेत. त्यामुळे नांदेडमध्ये राष्ट्रवादीचं अस्तित्व धोक्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ईश्वरासमान आहेत, असं वक्तव्य बापूसाहेब यांनी पत्रकारांशी बोलताना केलंय. मात्र जिल्ह्यातील पक्षातील काही बिनकामांच्या नेत्यांमुळे आपण पक्ष सोडत आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

आमदार अमिता चव्हाण यांनी बापूसाहेब देशमुख यांच्यामुळे लोकसभेला पराभव झाल्याचा आरोप केला होता. यात काय तथ्य आहे याबाबत पत्रकारांनी गोरठेकरांना विचारणा केली असता, आघाडी असताना मला याच लोकांनी दोनदा पाडलं, पण मी कुणावर आरोप केले नसल्याचा दावा त्यांनी केलाय.

दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून बापूसाहेब देशमुख हे भाजपच्या व्यासपीठावर अनेकदा दिसून आले. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी त्यांचे सख्य लपून राहिलेले नाही. मात्र राष्ट्रवादी सोडण्याबाबत त्यांनी प्रथमच जाहीरपणे भाष्य केलं. तूर्तास गोरठेकर यांनी कोणत्या पक्षात जाणार हे स्पष्ट केलं नसलं तरी ते भाजपात जातील, हे उघड आहे.

अशोक चव्हाण यांच्या अडचणी वाढल्या

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी विधानसभेचा आपला पारंपरिक मतदारसंघ असलेल्या भोकरकडे विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली. अशोक चव्हाण नित्यनेमाने भोकर विधानसभा मतदारसंघात जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेतात. इतकंच नाही, तर विविध स्थानिक पातळीवरच्या विकासकामांचे उद्घाटन करण्याचा सपाटाच चव्हाण यांनी लावलाय. मात्र लोकसभेला पराभूत झाल्यामुळे चव्हाण यांचं अचानकपणे वाढलेलं प्रेम भोकरकरांच्याही लक्षात आलंय. त्यातच आता स्वतः गोरठेकर यांनी भोकर विधानसभेसाठी दंड थोपटल्याने राजकीय सामना रंगणार यात काही शंका नाही.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.