Pune NCP : पाणीटंचाईच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक, महापालिकेसमोर केला 'घंटानाद'

Pune NCP : पाणीटंचाईच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक, महापालिकेसमोर केला ‘घंटानाद’

| Updated on: Mar 28, 2022 | 5:59 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या (PMC) प्रवेशद्वारावर पाणीटंचाईच्या विरोधात आज घंटानाद आंदोलन (Agitation) करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (NCP) शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या (PMC) प्रवेशद्वारावर पाणीटंचाईच्या विरोधात आज घंटानाद आंदोलन (Agitation) करण्यात आले. शिवाजीनगर परिसरात सातत्याने पाणीटंचाई, पाणीपुरवठा बंद असणे, कमी दाबाने पाणी पुरवठा होणे, अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे. सातत्याने होणाऱ्या या त्रासाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आवाज उठवत आज महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर घंटानाद आंदोलन केले. या आंदोलनानंतर पुणे महानगरपालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अनिरुद्ध पावसकर यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. जर येत्या काही दिवसात शिवाजीनगर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन घेण्यात येईल, असा इशारा यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला.