“महापुरूषांचा अवमान महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही!”, ‘महामोर्चा’आधी जितेंद्र आव्हाड काय म्हणाले…
'महामोर्चा'आधी जितेंद्र आव्हाड काय म्हणाले...
मुंबई : महाविकास आघाडीने ‘महामोर्चा’चं (Mahavikas Aghadi Mahamorcha) आयोजन केलं आहे. महापुरूषांच्या अवमानाविरोधात मविआने हे आंदोलन पुकारलं आहे. या ‘महामोर्चा’आधी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. “महापुरूषांचा अवमान महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही!”, असं ते म्हणालेत.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
महापुरूषांचा अवमान महाराष्ट्र कदापि खपवून घेणार नाही! त्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते रस्त्यावर उतरलो आहोत. ठाण्याहून मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईला निघाले आहेत. या लोकांच्या मनामध्ये आक्रोश आहे. अनेक दिवस या सरकारमधील नेतेमंडळी महापुरुषांबद्दल करत असलेला अपमान याच्या विरोधात हा आक्रोश आहे, असं आव्हाड म्हणालेत.
मुंबईतील हा महामोर्चा दडपण्यासाठी अशा प्रकारचा राजकारण करून ठाण्यामध्ये आंदोलन केली जात आहेत. यात नागरिकांना वेठीस धरलं जातं यात रिक्षा चालकांना मारण केलेली आहे परिवहन सेवा बंद केलेली आहे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास देण्यात आला आहे. हे सर्व करून या लोकांना काहीही मिळणार नाही, असंही आव्हाड म्हणालेत.
ठाण्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक मुंबईला चाललेत जवळपास 5000 हून जास्त नागरिक ठाण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. शरद पवार यांच्या समवेत मी मोर्चामध्ये सामील होत आहे, असं आव्हाडांनी सांगितलं.
‘महामोर्चा’
महापुरुषांच्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी ‘महामोर्चा’ काढत आहे. मुंबईच्या भायखळा इथल्या रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून या महामोर्चाची सुरुवात होईल तर सीएसएमटी स्टेशनच्या समोर टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या इथे हा मोर्चा संपेन. महाविकास आघाडीच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. या महामोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.