Video: “सदर मतदारसंघातील पोलीस हे रावळांच्या ठेवलेल्या XXX…” , गोटेंची भाषा घसरली, गुन्हा दाखल

माजी आमदार अनिल गोटे यांनी पोलिसांबाबत आक्षेपार्ह विधान केले, त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. (NCP leader Anil Gote offensive statement police)

Video: सदर मतदारसंघातील पोलीस हे रावळांच्या ठेवलेल्या XXX... , गोटेंची भाषा घसरली, गुन्हा दाखल
अनिल गोटे कथित आक्षेपार्ह विधान करताना
Follow us
| Updated on: Feb 15, 2021 | 9:15 PM

धुळे : “सिंदखेडा तालुक्यातील पोलीस हे रावळांच्या ठेवलेल्या XXX…’ असे आक्षेपार्ह विधान राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे (NCP leader Anil Gote) यांनी पोलिसांबद्दल बोलताना केले. त्यांच्या या वक्तव्याचा कथित व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे धुळे तसेच सिंदखेडा तालुक्यात संताप व्यक्त केला जात असून महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. (NCP leader Anil Gote given offensive statement on the police, police boys association demands to take Action)

नेमके प्रकरण काय?

शिंदखेडा तालुक्यात दोंडाईच्या या गावी येत्या 17 तारखेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा नियोजित दौरा आहे. या पार्श्वभूमीवर शिंदखेडा तालुका हा भयमुक्त तालुका करावा यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे गावागावात जाऊन दहशत मुक्त तालुका अभियान राबवत आहेत. यावेळी अनिल गोटे हे गावोगावी जाऊन शिंदखेडा तालुक्याचे आमदार जयकुमार रावळ यांच्याविरुद्ध आगपाखड करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या या अभियानादरम्यान एका गावात बोलताना गोटे यांची जीभ घसरली. बोलताना त्यांनी पोलिसांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा दावा केला जातोय. शिंदखेडा तालुक्यातील एका गावात बोलताना “तालुक्यातील पोलीस म्हणजे जयकुमार रावळ यांनी ठेवलेल्या xxx पोरं आहेत,” असे आक्षेपार्ह विधान केले असं म्हटलं जातंय.

पाहा अनिल गोटे यांच्या आक्षेपार्ह विधानाचा कथित व्हिडीओ :

गोटे यांच्या याच कथित वक्तव्याची दखल घेत पोलीस बोईज ट्रस्टने अनिल गोटे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनही दिले आहे.

दरम्यान, गोटे यांची ही व्हिडीओ क्लीप सध्या व्हायरल होत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस बॉईज संघटनेने गोटेंविरोधात तक्रार दिल्यानंतर आता पोलीस काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर बातम्या :

परत फिरा रे! खडसेंच्या प्रवेशानंतर अनिल गोटे आशावादी, भाजपवासी कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत परतण्याचे आवताण

(NCP leader Anil Gote given offensive statement on the police, police boys association demands to take Action)

अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.