Chaggan Bhujbal : फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळ पहिल्यांदांच माध्यमांसमोर, थेट म्हणाले…

महायुतीच्या विजायनंतर मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रावादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत काय घडलं, कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे माध्यमांसोर भुजबळांनी स्पष्टच सांगितलं.

Chaggan Bhujbal :  फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळ पहिल्यांदांच माध्यमांसमोर, थेट म्हणाले...
फडणवीसांच्या भेटीत काय चर्चा झाली, भुजबळ स्पष्ट बोलले
Follow us
| Updated on: Dec 23, 2024 | 11:57 AM

महायुतीच्या विजायनंतर मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले राष्ट्रावादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत काय घडलं, कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे माध्यमांसोर भुजबळांनी स्पष्टच सांगितलं. या भेटीत फडणवीस यांच्याशी सामाजिक राजकीय विषयांवर चर्चा झाली. महायुतीच्या विजयात ओबीसींचा जे पाठबळ मिळालं त्याचा मोठा वाटा आहे. ओबीसींनी महायुतीला आशिर्वाद दिला, त्याबद्दल सर्वांचे आभार मानले पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.

फडणवीसांनी भुजबळांना वेट अँड वॉचचा सल्ला दिल्याचं समजतंय. 10 दिवसांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे छगन भुजबळ यांच्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचीी चर्चा आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ ?

मी आणि समीर भुजबळ आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर अनेक गोष्टींवर चर्चा झाली. सामाजिक, राजकीय मुद्द्यांवर बोललो. काय काय घडलं, काय चालू आहे त्याबाबत चर्चा झाली. ते म्हणाले, वर्तमानपत्र आणि मीडियातून बऱ्याच गोष्टी पाहिल्या आणि ऐकल्या. ते म्हणाले, हे आपण मान्यच करायला हवं, की जो महाविजय मिळाला त्यामागे ओबीसींचं पाठबळ मोठ्या प्रमाणावर लाभलं. त्याचाही वाटा आहे. इतर गोष्टींचा वाटा आहे. ओबीसींनी महायुतीला आशीर्वाद दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानले पाहिजे. हे लक्षात घेऊन ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही, असं भुजबळांनी नमूद केलं.

फडणवसींचा भुजबळांना वेट अँड वॉचचा सल्ला

पण आता जे काही राज्यात सुरू आहे. आता पाच सहा दिवस मुलांना शाळा कॉलेजला सुट्ट्या आहेत. वेगळं वातावरण आहे. एक आठ दहा दिवस मला तुम्ही द्या. त्यानंतर आपण पुन्हा भेटू आणि एक चांगला मार्ग शोधून काढू, असं फडणवीस म्हणाले. तसेच ओबीसी नेत्यांना सांगा. मी साधकबाधक विचार करत आहे. हा निरोप ओबीसी आणि ओबीसींना पाठबळ देणाऱ्या घटकांना द्या, असं फडणवीस म्हणाले. आठ दहा दिवस वेळ द्या, असं फडणवीस म्हणाल्याचे भुजबळांनी नमूद केलं. एकंदरच फडणवीसांनी भुजबळांना वेट अँड वॉचचा सल्ला दिल्याचं समजत असून येत्या काही दिवसातंच ते भुजबळांबद्दल महत्वाचा निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा आहे.

भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....