मैं पुराने जमाने का सिक्का हूँ… मनातील खदखद शायरीच्या रुपाने आली ओठांवर.; भुजबळ नेमकं काय म्हणाले ?

नाशिकमध्ये त्यांनी समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत छगन भुजबळांचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी छगन भुजबळांनी दोन शायरी बोलत मनातील भावना मोकळ्या केल्या.

मैं पुराने जमाने का सिक्का हूँ... मनातील खदखद शायरीच्या रुपाने आली ओठांवर.; भुजबळ नेमकं काय म्हणाले ?
Follow us
| Updated on: Dec 18, 2024 | 2:55 PM

Chhagan Bhujbal Shayari : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज झाले आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात छगन भुजबळ यांना वगळण्यात आल्याने त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. त्यातच आता छगन भुजबळांनी नागपुरातील हिवाळी अधिवेशनाला जाणार नाही, असा निर्णय घेतला. त्यातच आज नाशिकमध्ये त्यांनी समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत छगन भुजबळांचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी छगन भुजबळांनी जोरदार भाषण केले. त्यावेळी त्यांनी तीन शायरी म्हणत मनातील भावना मोकळ्या केल्या.

“मी निवडून येणं किंवा मंत्री बनणं ही माझी हाव नाही. मला मंत्रिपदाची हाव नाही. मी १६ नोव्हेंबरला मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि १७ नोव्हेंबरला जालन्यात आलो. समीरला फोन येत होते. राजीनाम्याचा उल्लेख करू नका. एक व्यक्ती अर्वाच्च बोलला. म्हणून नगरच्या मिटिंगमध्ये मी राजीनाम्याचं बोललं. प्रश्न मंत्रिपदाचा नाही. अस्मितेचा आहे. एखाद्या समाजासाठी घेऊन शेवटपर्यंत लढणारी माणसं आपल्याला पाहिजे. ज्यावेळी हे कळल्यावर आश्चर्याचा धक्का बसणारच. मला मंत्रिपद न मिळाल्याने. पण तुम्ही दुखात राहू नका”, असे छगन भुजबळ म्हणाले.

छगन भुजबळांनी म्हटल्या तीन शायरी

नाशिकमध्ये केलेल्या भाषणात छगन भुजबळांनी तीन शायरी म्हटल्या. यावेळी त्यांनी शायरीच्या रुपाने मनातील खदखद बोलून दाखवली.  “कभी डर ना लगा, मुझे फासला देखकर, मै बढता गया, रास्ता देखकर, खुदही खुद नजदीक आती गयी मंजिल, मेरा बुलंद हौसला देखकर”, अशी पहिली शायरी छगन भुजबळांनी म्हटली.

“मेरे बारें में कोई राय मत बनाना गालिब, एक ऐसा दौर आयेगा, मेरा वक्त भी बदलेगा, और तेरी राय भी बदलेगी”, असेही छगन भुजबळ म्हणाले. “मैं मौसम नही हूँ जो पल में बदल जाऊँ, मैं इस जमीन से दूर कहीं और ही निकल जाऊँ, मैं उस पुराने जमाने का सिक्का हूँ मुझे फेंक न देना, हो सकता है बुरे दिनों में मैं ही चल जाऊँ”, असेही एक शायरी छगन भुजबळ म्हणाले.

“रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी लढणार”

“मंत्रिपदावर नसलो तरी तुमच्यासोबत आहे. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी लढणार आहे. तुमच्यासोबत लढता लढता शेवटचा श्वास घेणार आहे. यात मी कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. जिथे तुमचे प्रश्न आहेत. तिथे आपण एकजुटीने राहायचं आहे. मी तुमच्यासोबत राहणार. तुम्ही हिंमत ठेवा. वाट पाहा. तोपर्यंत आपलं काम सुरू ठेवा. पुढे कदाचित आणखी काही संकटं येण्याचे नाकारता येत नाही. तेव्हा पुन्हा ओबीसी एल्गार करावा लागणार आहे”, असे छगन भुजबळांनी यावेळी म्हटले.

दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.