नव्या सरकारचा शपथविधी कधी? भुजबळांच्या वक्तव्यानं संभ्रम वाढला!

नव्या सरकारचा शपथविधी येत्या पाच डिसेंबरला होणार आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत दोन दिवसांपूर्वी माहिती दिली होती, त्यावर आता भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नव्या सरकारचा शपथविधी कधी? भुजबळांच्या वक्तव्यानं संभ्रम वाढला!
Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Dec 02, 2024 | 3:06 PM

येत्या पाच डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. याबाबत दोन दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. मात्र शपथविधी सोहळ्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नव्या सरकारचा शपथविधी नेमका कधी होणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ? 

मुख्यमंत्रिपदाबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा अजून झालेली नाही, मात्र दुसरीकडे येत्या पाच डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली, यावर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. शपथविधीसाठी मोठी तयारी करावी लागते, उद्या राज्यपाल यांना वाटलं तर ते 6 तारीख  देखील करू शकतात असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता शपथविधीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

गृहमंत्रिपदावर प्रतिक्रिया 

दरम्यान एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. यावर देखील भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्री पदावरून काही पेच नाही, त्याच्यावरून काही अडले नाही. प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बाहेर होते एका कॉन्फरन्समध्ये ते व्यस्त होते. त्यामुळे याबाबतचा निर्णय थोडा पुढे गेला.  अंतर्गत चर्चा सर्व पक्षात झाली आहे, प्रत्येक खातं महत्वाचं आहे. गृह खातं जेवढं चांगलं आहे, तितकंच अडचणीचं देखील आहे. कोण कुठे दंगल करतो, बलात्कार करतो त्याचे प्रश्न गृहमंत्र्यांना विचारले जातात. मी गृहमंत्री असताना गँगवार सुरू होते. काळी दिवाळी साजरी करण्यात येत होती. मुंबईत लग्न देखील त्यावेळी कोणी करत नव्हते, गृहमंत्रिपद म्हणजे काही सोपं काम नाही. एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे, यावर चर्चा करून मार्ग काढू, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.