राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रूपाली थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला, राहुल शेवाळे यांची काय तक्रार केली?
शिवसेना शिंदे गटाचे खासदार यांच्यावर कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील आक्रमक झाल्या आहे.
प्रदीप कापसे, नागपूर : बाळासाहेबांची शिवसेना अर्थातच शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राहुल शेवाळे यांच्या विरोधातील पुरावे घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी राहुल शेवाळे यांच्या विरोधातील पुरावे देत थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान रूपाली पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कारवाई मागणी केली आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन खरंतर त्यांच्यावर होणाऱ्या आरोपाचे खंडन केले होते. त्यात त्यांना बदनाम करण्याचा संबंधित महिलेचा हेतु असल्याचे म्हंटले होते. त्यातच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी राहुल शेवाळे यांनी संबंधित महिलेवर अन्याय केला आहे. त्यामध्ये माझ्याकडे सगळे पुरावे असून त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाई करावी अन्यथा मला पुरावे जाहीर करावे लागतील असा इशारा रूपाली पाटील यांनी दिला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे खासदार यांच्यावर कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील आक्रमक झाल्या आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी राहुल शेवाळे यांच्या विरोधातील पुरावे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे भेट घेऊन दिले आहे.
खासदार राहुल शेवाळे यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुन्हा दाखल केला नाही तर थेट पुरावे जाहीर करेल आणि कायदेशीर कारवाई करेल असा इशारा रूपाली पाटील यांनी दिला आहे.
राहुल शेवाळे यांच्या विरोधात ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनीही चौकशी करावी अशी मागणी विधानपरिषदेत केली होती.
खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात मनीषा कायंदे यांच्यानंतर रूपाली पाटीलही आक्रमक झाल्या आहे, त्यामुळे खासदार शेवाळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
रूपाली पाटील यांनी राहुल शेवाळे यांच्या विरोधात असलेल्या पुराव्याची फाइल्स दिली आहे त्यामध्ये काही व्हिडिओ क्लिपचे पुरावे दिल्याची माहिती आहे,
खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारवाई करतात का? की रूपाली पाटीलच थेट पुरावे जाहीर करतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.