राज ठाकरेंच्या पत्रावर शरद पवारांनी बोलणं टाळलं पण, गोपीनाथ मुंडे गेले तेव्हा मी काय केलं हे स्पष्ट सांगितलं

प्रत्येक पक्षाला आपली भूमिका घ्यायचा अधिकार आहे. तसे राज ठाकरेंनी भूमिका घेतली असेल तर त्यावर हरकत घेण्याची गरज नाही, असं शरद पवार म्हणाले.

राज ठाकरेंच्या पत्रावर शरद पवारांनी बोलणं टाळलं पण, गोपीनाथ मुंडे गेले तेव्हा मी काय केलं हे स्पष्ट सांगितलं
Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 16, 2022 | 6:44 PM

मुंबई : राज्यातील अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्या निवडणुकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर भाजपने या निवडणुकीत मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत भाजप नेत्यांना पत्र लिहून बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन केले आहे. त्याच पत्रावर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी फारसं मत व्यक्त न करता राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मत मांडले असेल तर चांगले आहे म्हणत अंधेरीची पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असं आवाहन राजकीय पक्षांना केलं आहे. निवडून येणाऱ्या उमेदवाराला मिळणाऱ्या कालावधीचा विचार करता निवडणूक बिनविरोध व्हावी, असे मत शरद पवार यांनी मांडले आहे.

प्रत्येक पक्षाला आपली भूमिका घ्यायचा अधिकार आहे. तसे राज ठाकरेंनी भूमिका घेतली असेल तर त्यावर हरकत घेण्याची गरज नाही, असं शरद पवार म्हणाले.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली होती, त्यावेळी मी स्वतः त्यांच्या घरातील कुणी उमेदवार असेल तर मी उमेदवार देणार नाही असे जाहीर केले होते.

हे सुद्धा वाचा

रमेश लटके यांनी महानगरपालिका, विधिमंडळातील योगदान आणि उरलेला कालावधी पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी असेही मत पवारांनी मांडले आहे.

अंधेरी पूर्वची पोट निवडणूक प्रतिष्ठेची न करता महाराष्ट्रात चांगला मेसेज जाण्यासाठी ऋतुजा रमेश लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे असे आवाहन करत शरद पवारांनी महत्वाची भूमिका मांडली आहे.

राज ठाकरे यांनी देखील राजकारण करत असतांना ज्या व्यक्तीचे निधन झाले आहे त्या व्यक्तीच्या घरातील कुणी उभे राहत असेल तर बिनविरोध निवडून द्यावे हीच खरी त्या व्यक्तीला श्रद्धांजली असेल असे मत मांडले आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.