मी कृषी मंत्री असताना…; सांगल्यातील सभेत शरद पवार नेमकं काय म्हणाले?
NCP Leader Sharad Pawar Sangola Sabha Full Speech about Loksabha Election 2024 : महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी नेमकं काय म्हटलं? वाचा सविस्तर...
मी देशाचा कृषीमंत्री असताना आत्महत्या शेतकरी का करतो? हे पाहण्यासाठी जनतेत गेलो. माझ्या हे लक्षात आले शेतकऱ्यांवरती बँकांचे सोसायटीचे कर्ज आहे. त्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचे कर्जमाफी करून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याचे काम केलं. शेतकऱ्यांचा आत्महत्येचा दर 12 ते 14 टक्के होता. तो चार टक्क्यांवर आणण्याची भूमिका घेतली.आताच्या काळात शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. पण हे सरकार ती भूमिका घेत नाही, असं म्हणत शरद पवार यांनी मोदी सरकारच्या धोरणांवर टीकास्त्र डागलं. ते सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यात बोलत होते.
शेती प्रश्नांवर भाष्य
शरद पवार यांनी सांगोल्यात बोलताना शेती प्रश्नांवर भाष्य केलं. शेती व्यवसायाला जागतिक बाजारात भाव मिळत असताना निर्यातीला बंदी घालण्याची भूमिका या सरकारने घेतली. देशात सगळ्यात जास्त उसाचे उत्पन्न आणि दुधाचे उत्पन्न महाराष्ट्रात होत आहे. साखर जास्त प्रमाणात तयार होते. तरीही जागतिक बाजारातली व्यवसायाची संधी डावलून शेतकऱ्याचे नुकसान हे सरकार करत आहे, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
सांगोल्यात शरद पवारांची सभा
माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारासाठी सांगोल्यात सभा होत आहे. या सांगोल्यातील सभेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, शेकापचे नेते बाबासाहेब देशमुख उपस्थित आहेत. यासोबतच महाविकास आघाडीचे इतर नेते उपस्थित आहेत. यावेळी बोलताना शरद पवार यांनी हे विधान केलं आहे.
शरद पवारांचं आवाहन काय?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत असल्याने शरद पवार यांनी सभेत बोलताना स्थानिक लोकांना आवाहन केलं. गेल्या अडीच वर्षांमध्ये गेल्या अडीच वर्षांमध्ये लोकशाहीची एकही निवडणूक झालेली नाही. पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका असेल, या निवडणुका सरकारने होऊ दिल्या नाहीत. हे हुकूमशाहीचं सरकार परत देशात येऊ द्यायचे नसेल तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.