Sharad Pawar : सत्ता तुमची, निर्णय घेण्याचा अधिकार तुमचा अन् म्हणे विरोधकांनी भूमिका घ्यावी; शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले
विरोधकांनी मत मांडावं असा त्यांचा (सरकारचा) आग्रह आहे.राज्यकर्ते हे, निर्णय द्यायचा अधिकार यांचा, सुसंवाद त्यांनी साधला आणि विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी आणि मग निर्णय घ्यावा. ही भूमिका समंजसपणाची नव्हती, शहाणपणाची नव्हती, अशा शब्दांत पवार यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली होती. राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण तापत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन दोन्ही समाज एकमेकांच्या समोर उभा ठाकला जायोत. त्यामुळे वातावरण शांत व्हावं या उद्देशाने आपण शरद पवारांची भेट घेतल्याचं भुजबळ यांनी सांगितलं होत. त्याच मुद्यावर बोलताना शरद पवार यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. पुणे पत्रकार संघात माध्यमांशी संवाद साधत होते, तेव्हा त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली. विरोधकांनी मत मांडावं असा त्यांचा (सरकारचा) आग्रह आहे. राज्यकर्ते हे, निर्णय द्यायचा अधिकार यांचा, सुसंवाद त्यांनी साधला आणि विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी आणि मग निर्णय घ्यावा. ही भूमिका समंजसपणाची नव्हती, शहाणपणाची नव्हती, अशा शब्दांत पवार यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारलं. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून विरोधकांनी भूमिका स्पष्ट करण्याची वारंवार मागणी केली जात आहे, त्यावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारले.
काय म्हणाले शरद पवार ?
भुजबळांची दोन भाषणं छान झाली. त्या आधी ते बीडला गेले. बारामतीतही चांगले भाषण केलं. दोन्ही भाषणात माझ्याबद्दल आस्था आणि कौतुक व्यक्त केलं. त्यानंतर ते मला भेटायला आले. मला ताप होता. मी दोन दिवस सुट्टी काढली. मला सांगण्यात आलं की भुजबळ साहेब आले. एक तासापासून आले आहेत, जायचंच नाही म्हणतात. त्यानंतर ते आले, मला भेटले आणि त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. या गोष्टी केल्या तर राज्याचं हित आहे असं ते म्हणाले. महाराष्ट्रातील वातावरण दुरुस्त करायचं असेल तर मी आलं पाहिजे, असं ते म्हणाले.
सर्वपक्षीय बैठकीला का गेले नाही ?
मी बैठकीला गेलो नाही. त्याची दोन कारणे होती. मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. जरांगेचं उपोषण सुरू होतं तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. त्यांचा संवाद काय झाला माहीत नाही. त्यानंतर उपोषण सुटलं. त्यानंतर जरांगे पाटील यांची नवी मुंबईत एक संयुक्त कार्यक्रम पाहिला. याचा अर्थ काही तरी त्यांच्यात संवाद होता. तो आम्हाला माहीत नव्हता.
दुसरीकडे ओबीसी नेत्यांचं उपोषण सुरू होतं. तिथे राज्य सरकारचे मंत्री गेले. त्यांचं काय बोलणं झालं माहीत नव्हतं. त्यांच्यातील सुसंवाद माहीत नव्हता. त्यामुळे मिटिंगला न जाण्याचं कारण एकच होतं की, सरकार जरांगे आणि ओबीसीं नेत्यांशी बोलत आहेत. त्यानंतर नेते काही विधानं करत आहेत. पण संवाद काय झाला आणि प्रस्ताव काय होता हे पब्लिकला आणि आम्हाला माहीत नव्हतं. त्यामुळे जरांगे यांना सरकारने काय आश्वासन दिलं याचं वास्तव चित्र आपल्याकडे येत नाही आणि दुसऱ्या बाजूने ओबीसींना जी कमिटमेंट केली त्याची माहिती येत नाही, तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात अर्थ नाही. त्यांनी आम्हाला माहिती दिली तरच आम्ही जाऊ शकतो असं ठरवलं, अस शरद पवार म्हणाले.
त्यांनी ४०-५० लोकांना बोलावलं आणि चर्चा केली. तिथे मत मांडावं असं योग्य वाटलं नाही. रोधकांनी मत मांडावं असा त्यांचा आग्रह आहे. राज्यकर्ते हे, निर्णय द्यायचा अधिकार यांचा, सुसंवाद त्यांनी साधला आणि विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी आणि मग निर्णय घ्यावा. ही भूमिका समंजसपणाची नव्हती, शहाणपणाची नव्हती, असं म्हणतं शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना फटकारलं.
भुजबळ काय म्हणाले होते ?
“ गरीब दोन्ही समाजात आहेत. त्यात काही लोक संभ्रम निर्माण करत आहेत. लग्नात जायचे नाही, हॉटेलात जायचे नाही, हे कधी थांबणार? यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. हे थांबले पाहिजे याठी मी पुढाकार घेतला. शरद पवारांनी हे पाहिलं आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे. शरद पवारांना अनुभव जास्त आहे. राज्यात शांतता निर्माण होण्यासाठी शरद पवारांची मदत घेतली तर काय हरकत आहे?”, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.