पुढच्या काही दिवसात राष्ट्रवादीला न पचवता येणारे पाच धक्के

पुढच्या काही दिवसात आणखी नेते पक्षाला सोडचिठ्ठी (NCP leaders in BJP) देणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी अत्यंत जवळीक असणाऱ्या नेत्यांचाही यामध्ये समावेश आहे.

पुढच्या काही दिवसात राष्ट्रवादीला न पचवता येणारे पाच धक्के
Follow us
| Updated on: Aug 26, 2019 | 6:07 PM

मुंबई : शरद पवार यांनी 1999 मध्ये काँग्रेसचे दिग्गज नेते सोबत घेऊन राष्ट्रवादीची स्थापना केली होती. पण याच राष्ट्रवादीतील पवारांना तेव्हा साथ देणारे नेते आता पक्ष सोडत (NCP leaders in BJP) आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीच्या अनेक संस्थापक सदस्यांनी पक्षाला रामराम (NCP leaders in BJP) केलाय. पुढच्या काही दिवसात आणखी नेते पक्षाला सोडचिठ्ठी (NCP leaders in BJP) देणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी अत्यंत जवळीक असणाऱ्या नेत्यांचाही यामध्ये समावेश आहे.

दिलीप सोपल

बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल (NCP MLA Dilip Sopal) यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. दिलीप सोपल हे 28 तारखेला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती सुरुच आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार दिलीप सोपल (NCP MLA Dilip Sopal) शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु होती. अखेर दिलीप सोपल यांनी राजीनामा देऊन त्यावर शिक्कामोर्तब केलं.

दिलीप सोपल कोण आहेत?

  • दिलीप सोपल बार्शी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात.
  • आघाडी सरकारमध्ये विविध मंत्रालयांची जबाबदारी त्यांनी सांभाळली.
  • दिलीप सोपल पहिल्यांदा 1985 मध्ये आमदार झाले, तेव्हापासून 2014 पर्यंत पाच वेळा ते निवडून आले आहेत. 2004 मध्ये त्यांचा पराभव झाला होता.
  • सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दांडगा जनसंपर्क ही जमेची बाजू
  • अजित पवारांशी मैत्रीचे संबंध, शरद पवारांशी काँग्रेसच्या काळापासून एकनिष्ठ नेता अशी त्यांची ओळख आहे.
  • राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य म्हणून ओळख

पाटील पिता-पुत्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला (NCP Shivswarajya Yatra ) पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ पद्मसिंह पाटील (Dr Padmasinh Patil) आणि त्यांचे आमदार पुत्र राणा जगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांनी पाठ फिरवली. राष्ट्रवादीचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष राणा पाटील भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर यामुळे शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. डॉ पाटील परिवारातील पिता-पुत्र बरोबरच सून जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चना पाटील आणिनातू मल्हार पाटील यापैकी एकही जण या शिवस्वराज्य यात्रेला हजर नव्हता.

माजी खासदार धनंजय महाडिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ते (Dhananjay Mahadik) 31 ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मोदी 31 ऑगस्टला सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यावेळी हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. धनंजय महाडिक हे आधी शिवसेनेत होते, मग त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीकडून ते खासदार झाले. मात्र यंदाच्या पराभवानंतर ते आता भाजप प्रवेशाच्या तयारीत आहेत. भाजपमध्ये प्रवेश केला तर तो त्यांचा तिसरा पक्ष असेल.

माजी मंत्री भास्कर जाधव

राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) शिवसेनेत (Shivsena) घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत भास्कर जाधव यांनी कालच तासभर चर्चा केली होती.

गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंसोबत भास्कर जाधव यांची झालेली ही दुसरी बैठक होती. भास्कर जाधव हे कोकणातील गुहागर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात नगरविकास, क्रीडा, वन अशी विविध मंत्रालयं सांभाळली आहेत. रत्नागिरीच्या पालकमंत्रिपदाची धुराही त्यांच्या खांद्यावर होती.

दरम्यान, माजी मंत्री छगन भुजबळ, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे देखील अनुक्रमे शिवसेना आणि भाजपात जाणार असल्याचं बोललं जातंय. तर रामराजे निंबाळकरही लवकरच शिवबंधन हातात बांधण्याच्या तयारीत आहेत.

यापूर्वी राष्ट्रवादी सोडलेले दिग्गज नेते

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.