अखेर राष्ट्रवादीचा माढा आणि उस्मानाबादचा उमेदवार ठरला, अधिकृत घोषणा बाकी

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसने उस्मानाबाद आणि माढा मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित केला आहे. माढ्यातून विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, तर उस्मानाबादमधून बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांना उमेदवारी निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबाबत केवळ अधिकृत घोषणा करणं बाकी आहे. संजय शिंदे हे माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे बंधू आहेत. भाजपच्या मदतीने ते […]

अखेर राष्ट्रवादीचा माढा आणि उस्मानाबादचा उमेदवार ठरला, अधिकृत घोषणा बाकी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसने उस्मानाबाद आणि माढा मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित केला आहे. माढ्यातून विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, तर उस्मानाबादमधून बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांना उमेदवारी निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून याबाबत केवळ अधिकृत घोषणा करणं बाकी आहे.

संजय शिंदे हे माढ्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे यांचे बंधू आहेत. भाजपच्या मदतीने ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. शिवाय राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे नुकत्याच भाजपात प्रवेश केलेल्या रणजितसिंह मोहिते पाटलांचे संजय शिंदे हे कट्टर विरोधक आहेत. राष्ट्रवादीने शिंदे बंधूंना बळ दिल्यामुळेच मोहिते पाटील घराणं नाराज होतं. संजय शिंदे यांनी 2014 ला विधानसभा निवडणूक स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढवली होती.

अजित पवार यांच्या आणखी एका निकटवर्तीयाला उमेदवारी मिळणार आहे. उस्मानाबादमधून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांचं तिकीट निश्चित झाल्याची माहिती आहे. बार्शी मतदारसंघामध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे, शिवाय तेही मोहिते पाटलांचे कट्टर विरोधाक मानले जातात. दिलीप सोपल लोकसभेसाठी इच्छुक नाहीत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सोपल यांना निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्याचीही माहिती आहे.

माढ्यातून माजी आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळेल, असं बोललं जात होतं. पण पवारांनी पुढची खेळी आखत मोहिते पाटलांच्या विरोधकांनाच रिंगणात उतरवलंय. विशेष म्हणजे उस्मानाबादमध्ये ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटलांनाही डावलण्यात आलंय. पद्मसिंह पाटलांनी उमेदवारी अर्जही आणला होता.

वाचा – तिकीट जाहीर होण्याअगोदरच पद्मसिंह पाटलांनी उमेदवारी अर्ज घेतला

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.