“अमित शाह गुजरातचे आहेत, त्यांनी महाराष्ट्रात नाक खुपसू नये”; राष्ट्रवादीच्या नेत्यांनं शाह, फडणवीसांवर साधला निशाणा

अमित शाह यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचा गुणगौरव केला असला तरी त्यांनी वाचलेली स्क्रिप्ट ही देवेंद्र फडणवीस यांनी लिहून दिली होती अशी टीका त्यांनी केली आ

अमित शाह गुजरातचे आहेत, त्यांनी महाराष्ट्रात नाक खुपसू नये; राष्ट्रवादीच्या नेत्यांनं शाह, फडणवीसांवर साधला निशाणा
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 5:44 PM

अकोला: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या काल पुणे आणि कोल्हापूर दौऱ्यावरून राज्यातील राजकारण सगळे ढवळून निघाले आहे. आरोप-प्रत्यारोपांमुळे एकमेकांवर जोरदार फैरी झाडण्यात येत आहे. त्यातच काल अमित शाह यांनी बाबासाहेब पुरंदरेंमुळे देशाला छत्रपती शिवाजी महाराज माहिती पडली असलच्याचे त्यांनी सांगितले होते. त्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिठकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित शाह यांनी वाचलेली कालची स्क्रीप्ट ही देवेंद्र फडणवीस यांनी लिहून दिली होती असा घणाघात अमोर मिठकरी यांनी केला आहे.

काल कोल्हापूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे देशाला छत्रपती शिवाजी महाराज माहिती पडले असल्याची मत त्यांनी व्यक्त केले होते.

छत्रपती आणि हिंदवी स्वराजचा संकल्प घेऊन गुलामगिरीची साखळी तोडली होती. त्यामुळे शिवसृष्टी जरूर पाहा, बाळासाहेब पुरंदरेंनी खूप छान काम केले असल्याचं वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचा गुणगौरव केल्यानंतर आता राज्यातील राजकारण आणखी तापले आहे. त्यावरूनच अमोल मिठकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपवर आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

अमित शाह यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचा गुणगौरव केला असला तरी त्यांनी वाचलेली स्क्रिप्ट ही देवेंद्र फडणवीस यांनी लिहून दिली होती अशी टीका त्यांनी केली आहे.

अमित शाह तुम्ही गुजरातचे आहात तर गुजरातमध्ये राहा महाराष्ट्रच्या इतिहासमध्ये नाक खुपसण्याचा प्रयत्न करू नका. महाराष्ट्रात तुम्ही काय इथे तळवे चाटण्यासाठी आला होतात का असा खोचक सवाल त्यांनी त्यांना केला आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचा वाद वाद चिघळण्याची शक्यता आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.