मनसैनिकांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माझ्यावर…

NCP MLA Amol Mitkari on MNS Halla : मनसैनिकांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर अमोल मिटकरी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अमोल मिटकरी यांनी मनसेवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. संदिप देशपांडे यांच्यावरही अमोल मिटकरींनी टीका केली आहे. मिटकरी काय म्हणाले? वाचा सविस्तर...

मनसैनिकांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माझ्यावर...
अमोल मिटकरी, आमदारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jul 30, 2024 | 7:22 PM

आज दुपारी अकोल्यामध्ये राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. अमोल मिटकरी आज अकोल्यात विश्रामगृहात होते. मिटकरी विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते. तेव्हा विश्रामगृहाबाहेर मनसैनिक आले. त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला केला. यावर अमोल मिटकरी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मनसेने केलेल्या हल्ल्याचा निषेध अमोल मिटकरींनी केला. लोकांचे जीव घेण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिले होते का?, असा सवाल अमोल मिटकरी यांनी विचारला आहे.

हल्ल्यावर पहिली प्रतिक्रिया

माझ्यावर जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. जाण्यापूर्वी ते एका स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्याला भेटून गेले. मनसे जर सत्तेत येण्यापूर्वी असे हल्ले करत असेल. तर सत्तेत आल्यानंतर काय करतील विचार करा, असं अमोल मिटकरी म्हणालेत. मनसेचे नेते संदिप देशपांडे यांच्यावरही मिटकरींनी टीका केली आहे. संदीप देशपांडेला राज ठाकरे यांनी सिगारेट ओढली म्हणून कानाखाली मारली. संदीप देशपांडे यांनी एकट्यात येऊन मला भेटावं, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं.

हे लोक दलित मुस्लिम लोकांना मारतील. मी नाव घेतलं नाही मग यांनी स्वतःवर का ओढून घेतलं? राज ठाकरे यांना त्यांच्या घरावर शिवाजी महाराजाचे नाव लावण्याचा अधिकार नाही. माझ्या घरावर हल्ला करण्याचा त्यांचा डाव होता..मला पोलीस संरक्षणची गरज नाही. सत्तेतल्या आमदारांला चार चार तास बसावं लागतं. हल्ला करन ही झुंडशाही आहे. माझ्यासारख्याला असा त्रास होत असेल तर सर्वसामान्य लोकांचे काय होत असेल, असं मिटकरींनी म्हटलं आहे.

गाडीवर हल्ला का?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या धरणाबाबतच्या जुन्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी काल पुण्यात बोलताना बोचरी टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलं. राज ठाकरे यांचा ‘सुपारीबाज’ असा उल्लेख केला होता. याच कारणामुळे मनसैनिक भडकले. त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.