Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापुरातल्या दोन आमदारांनीही राष्ट्रवादीची धाकधूक वाढवली

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी सोलापुरात दाखल झाले. मात्र अजित पवार (Ajit Pawar) घेत असलेल्या मुलाखतीला बार्शीचे आमदार दिलीप सोपल (NCP MLA Dilip Sopal) आणि माढ्याचे आमदार बबन शिंदे (NCP MLA baban shinde) यांनी जाण्याचं टाळलं.

सोलापुरातल्या दोन आमदारांनीही राष्ट्रवादीची धाकधूक वाढवली
Follow us
| Updated on: Jul 26, 2019 | 6:00 PM

सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला गळती लागली आहे. त्यातच सोलापूर जिल्ह्यातील दोन आमदारांनी पक्षाची धाकधूक वाढवलीय. राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीला राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी दांडी मारली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी सोलापुरात दाखल झाले. मात्र अजित पवार (Ajit Pawar) घेत असलेल्या मुलाखतीला बार्शीचे आमदार दिलीप सोपल (NCP MLA Dilip Sopal) आणि माढ्याचे आमदार बबन शिंदे (NCP MLA baban shinde) यांनी जाण्याचं टाळलं. त्यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलंय.

गेल्या कित्येक दिवसांपासून बार्शीचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल हे शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. तर माढ्याचे आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे माढ्यातून भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यातच दोन्ही आमदारांनी मुलाखतीला जाणं टाळल्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळालंय.

अजित पवार यांनी याप्रकरणी खुलासा केला. दिलीप सोपल हे देवकार्यासाठी बाहेर गेल्याचं ते म्हणाले. तर बबन शिंदे का आले नाहीत याबाबत आपण विचारणा करणार असल्याचं पवार यांनी म्हंटलंय. दिलीप सोपल हे अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. पण अधिकृतपणे कोणतंही स्पष्टीकरण न देता दोन्ही आमदारांनी दांडी मारली.

30 जुलैला राष्ट्रवादीला मोठं भगदाड?

येत्या 30 जुलै रोजी राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, त्यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड आणि राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ येत्या 30 जुलैला भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. तिघांनीही भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. वैभव पिचड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती दोन दिवसांपूर्वीच समोर आली होती.

अगोदर राष्ट्रवादीत असलेले भाजप आमदार प्रसाद लाड यांनी या दिग्गज नेत्यांना भाजपात आणण्याची तयारी केल्याचं बोललं जातंय. कर्नाटकच्या आमदारांची जबाबदारी प्रसाद लाड यांनी यशस्वीपणे निभावल्यानंतर आणखी एक मोहिम फत्ते केल्याची माहिती आहे.

औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी
औरंगजेबाच्या कबरीखाली आपणही मरावं... बच्चू कडू यांची सरकारवर नाराजी.
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?
नागपूर राड्यात आणखी एक नाव समोर; कोण आहे सय्यद अली?.
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल
8 जूनच्या रात्री कुठे अन् लोकेशन काय? राणेंचा आदित्य ठाकरेंना एकच सवाल.
तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही? अंबादास दानवे भडकले
तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही? अंबादास दानवे भडकले.
'ओ अनिल परब..आम्हाला हलक्यात घेऊ नका'; चित्रा वाघ सभागृहात कडाडल्या
'ओ अनिल परब..आम्हाला हलक्यात घेऊ नका'; चित्रा वाघ सभागृहात कडाडल्या.
सालियन प्रकरणात करूणा शर्माची उडी, 'त्या' प्रकरणाचा उल्लेख करत...
सालियन प्रकरणात करूणा शर्माची उडी, 'त्या' प्रकरणाचा उल्लेख करत....
सालियान प्रकरणात महायुतीचे तीन नेते आदित्य ठाकरेंच्या पाठीशी?
सालियान प्रकरणात महायुतीचे तीन नेते आदित्य ठाकरेंच्या पाठीशी?.
नागपूर हिंसाचाराचं बंगलादेश कनेक्शन? फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा
नागपूर हिंसाचाराचं बंगलादेश कनेक्शन? फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा.
बच्चू कडुंचं उद्यापासून रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन
बच्चू कडुंचं उद्यापासून रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन.
मुलाला वाचवा... ठाकरेंचा फोन होता, नितेश राणेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
मुलाला वाचवा... ठाकरेंचा फोन होता, नितेश राणेंचा खळबळजनक गौप्यस्फोट.