Jitendra Avhad : एसी लोकलच्या विरोधात लवकरच एसी फेको आंदोलन करणार, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा इशारा

एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्याने साधारण लोकल गाड्या कमी करण्यात आल्या असून, साध्या लोकल ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात असून, प्रवाशांवर रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Jitendra Avhad : एसी लोकलच्या विरोधात लवकरच एसी फेको आंदोलन करणार, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा इशारा
जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेसImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 28, 2022 | 6:07 PM

ठाणे : मध्य रेल्वेवर एसी लोकल (AC Local)च्या फेऱ्या वाढवल्यामुळे ठाणे, कळवा, बदलापुरात सुरू झालेलं आंदोल आता प्रत्येक स्टेशनवर दिसणार आहे. एसी लोकांच्या फेऱ्या वाढल्यामुळे सामान्य लोकलसाठी प्रवाशांना ताटकळत उभे रहावं लागतंय. त्यामुळे अनेक प्रवासी नाराजी व्यक्त करत आंदोलनाचं हत्यार उचलत आहेत. आता रेल्वे प्रवाशांच्या या समस्येला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) ही मैदानात उतरली आहे. आज कळवा परिसरात जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनी रेल्वे प्रवासी संघटना आणि रेल्वे प्रवाशांबरोबर एक बैठक आयोजित केली होती. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सर्वात प्रथम रेल्वेच्या 175 डेसिबल आवाजाच्या भोंग्याविरोधात तक्रार देणार असल्याचे मत स्पष्ट केले. तसेच लवकरच एसी फेको आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळेस त्यांनी दिला.

हजारो लोकं उचलली तरी आंदोलन थांबवता येणार नाही : आव्हाड

दुसरीकडे ठाण्यातील पारसिक भोगद्यामधून एक्सप्रेस गाड्या जात नसून, स्लो ट्रॅकवरुन जात असल्याने या ठिकाणी इमारत कंपोजर होऊन एखादी इमारत कोसळली तर… रेल्वेला भारत आपल्या बापाचा आहे, आम्हाला कुठलाही कायदा लागू नये असं वाटतंय. म्हणून जी कारवाई सर्वसामान्यावर डेसिबलसाठी करत असतात ती कारवाई रेल्वेवर करावी. नाहीतर ओरिजनल ट्रॅकवरून त्यांनी गाड्या चालवाव्या, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्याचबरोबर दुपारी 12 ते 5 आणि रात्री 8.30 ते सकाळी 7 वाजेपर्यंत 50 रेल्वे चालवा आम्हाला काही हरकत नाही. मात्र पिक हवर्समध्ये AC ट्रेन चालू देणार नाही आणि पराक्रमीचं आंदोलन होईल. हे आंदोलन एका स्टेशनसाठी मर्यादित नसेल. हजारो लोक उचलली तरी तुम्हाला ते आंदोलन थांबवताही येणार नाही, असा इशाराही यावेळेस जितेंद्र आव्हाड यांनी प्रशासनाला दिला आहे.

ठाणे, कळवा, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये रेल्वेच्या एसी गाड्यांविरोधात सामाजिक संघटना, रेल्वे संघटना, प्रवासी हेही मोठ्या प्रमाणात संतप्त झाले आहेत. एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्याने साधारण लोकल गाड्या कमी करण्यात आल्या असून, साध्या लोकल ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात असून, प्रवाशांवर रेल्वे प्रशासनावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

मध्य रेल्वेत किती एसी गाड्या व किती प्रवासी

मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वेतून येणारे उत्पन्न देशात सर्वाधिक आहेत. साध्या लोकल रद्द करून एसी लोकल चालवल्या जात आहेत. 10 एसी ट्रेनमधून 5700 प्रवासी प्रवास करतात. अशाप्रकारे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर सध्या वातानुकूलित लोकलच्या 66 फेऱ्या होतात. यापैकी 34 फेऱ्या या अतिरिक्त आहेत. उर्वरीत 32 फेऱ्या धीम्या-जलद मार्गावरील सामान्य लोकलच्या जागी चालवण्यात येत आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी आंदोलन झाले असताना यामधून 10 एसी गाड्या रद्द करण्यात आल्या. सध्या एकूण 55 एसी गाड्यांच्या फेरी सुरू आहेत. भविष्यात 238 एसी लोकल MRVC अंतर्गत लवकरच सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे संघटनेकडे देण्यात आली. सर्वसामान्यांसाठी सर्वसामान्य लोकलच्या 1853 फेऱ्या सुरू असून, यात 15 डब्यांच्या दोन गाड्या, 12 डब्यांच्या व आठ डब्यांच्या इतर गाड्या सुरू आहेत. ज्यात 45 लाख सर्वसामान्य प्रवासी प्रवास करतात. (MLA Jitendra Avhad warning to protest against AC local)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.