VIDEO: आजोबांच्या पावलावर नातवाचे पाऊल, रोहित पवारांच्या नगरच्या सभेची महाराष्ट्रभर चर्चा का?
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अहमदनगरमध्ये भर पावसात भाषण केलं.
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अहमदनगरमध्ये भर पावसात भाषण केलं. उपस्थितांनी देखील पावसात उभं राहून हे भाषण ऐकलं. या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील ऐतिहासिक सभेची आठवण काढली जातेय. रोहित पवार यांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमात भर पावसात उपस्थितांना संबोधन करत त्यांच्या उपक्रमांचं कौतुकही केलं. हा शिवजयंती कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता (NCP MLA Rohit Pawar Ahmednagar speech on Shiv Jayanti in rain).
रोहित पवार शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आज (19 फेब्रुवारी) जामखेडमध्ये आले होते. त्यांनी भाषणाला सुरुवात केली आणि कार्यक्रमादरम्यान अचानक पावसाच्या सरी कोसळू लागल्या. मात्र, अशाही स्थितीत रोहित पवार यांनी आपलं भाषण बंद न करता उपस्थितांशी संवाद सुरूच ठेवला.
Video : Ahmednagar | Rohit Pawar | भर पावसात रोहित पवारांचं भाषण-tv9@RRPSpeaks @NCPspeaks #RohitPawar pic.twitter.com/DAc5ja1aoY
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 19, 2021
रोहित पवार आपल्या भाषणात म्हणाले, “आज शिवजयंतीनिमित्त मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आज येथे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. काही तरुणांनी मर्दाने खेळांचे प्रात्यक्षिक दाखवले. आज करण्यासारखे खूप होते. मात्र अचानक पाऊस आला. त्यामुळे कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. मी आयोजकांना एवढेच सांगतो की, पाऊस आला असला तरी तुमचे प्रयत्न हे महत्त्वाचे होते. उद्देश महत्त्वाचा होता.”
“दिवस चांगला होता. अशाच प्रकारे लोकांच्या सेवेसाठी तुम्ही काम करत राहा, असे आवाहनही रोहित पवार यांनी यावेळी केले. दरम्यान, पाऊस सुरू असतानाही रोहित पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधल्याने अनेकांना शरद पवारांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली,” असंही रोहित पवार यांनी नमूद केलं.
भरपावसातील भाषणात शरद पवार काय म्हणाले होते?
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि सातारा लोकसभा पोटनिवडणुकीवेळी शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात भाषण केलं होतं. 18 ऑक्टोबर 2019 रोजी केलेल्या भाषणात, शरद पवारांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलेल्या उदयनराजे भोसलेंवर हल्लाबोल केला होता.
त्यांचे पैलवान तेल लावून तयार होते. त्यांनी शड्डू ठोकले पण समोर पैलवानच दिसत नाहीत, अशी त्यांची दर्पोक्ती. ते म्हणाले, #शरदपवार संपले. पण १८ ऑक्टोबर २०१९ रोजी साताऱ्यात साक्षात वरुणराजा पवारसाहेबांच्या स्वागताला धावला
जनता चिंब भिजली दिल्ली मात्र थिजली#सातारा_सभा_वर्षपूर्ती pic.twitter.com/PiWQ8sPt8I
— NCP (@NCPspeaks) October 17, 2020
शरद पवार म्हणाले होते, “चूक झाली तर ती चूक कबुल करायची असते. लोकसभा निवडणुकीतील उमेदवाराच्या निवडीत माझ्याकडून चूक झाली. हे मी जाहीरपणे साताऱ्यात कबूल करतो. ती चूक दुरुस्त करण्यासाठी साताऱ्यातील घराघरातील तरुण, वडिलधारी सगळेजण 21 ऑक्टोबरची (मतदाना दिवशीची) वाट पाहात आहेत. ते मतदानाच्या दिवशी आपल्या मताचा निर्णय घेऊन श्रीनिवास पाटलांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील. यातून सातारकर आम्ही लोकांनी जी काही चूक केली त्याबाबत जो निर्णय घ्यायचा तो घेतील.”
हेही वाचा :
पायाला जखम, भरपावसात भाषण, पाऊस कोसळला, पवार उदयनराजेंवर बरसले
शरद पवारांची भर पावसात सभा, श्रीनिवास पाटील यांच्या दुर्लक्षित राहिलेल्या 2 घोषणा
व्हिडीओ पाहा :
NCP MLA Rohit Pawar Ahmednagar speech on Shiv Jayanti in rain