Rohit Pawar | जेव्हा रोहित पवार हातगाडीवर स्वत: अंडा भुर्जी बनवतात…
आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी सायंकाळी नवी मुंबईचा फेरफटका मारला. यावेळी त्यांनी एका अंडा भुर्जीच्या हातगाडीवर स्वत: अंडा भुर्जी बनवली.
नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी सायंकाळी (Rohit Pawar Cook Anda Bhurji) नवी मुंबईचा फेरफटका मारला. यावेळी त्यांनी एका अंडा भुर्जीच्या हातगाडीवर स्वत: अंडा भुर्जी बनवली. रोहित पवारांचं हे नवं रुप पाहून सर्वच आवाक झाले. एक आमदार रस्त्यावरील अंडा भुर्जीच्या हातगाडीवर स्वत: अंडा भुर्जी बनवतो हे पाहून सर्वच चकित झाले (Rohit Pawar Cook Anda Bhurji).
याबाबत आमदार रोहित पवारांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली. “नवी मुंबईत विविध ठिकाणी भेट देत असताना भूक लागल्याने एके ठिकाणी सर्वांनी अंडा भुर्जीचा आस्वाद घेतला.यावेळी अंडा भुर्जी बनवतानाचं त्या युवाचं स्कील पाहून मलाही अंडा-भुर्जी बनवण्याचा मोह आवरला नाही.शेवटी त्याच्यासारखी भुर्जी मला बनवता आली नाही पण प्रयत्न केल्याचा आनंद मात्र मिळाला”, असं त्यांनी सांगितलं.
नवी मुंबईत विविध ठिकाणी भेट देत असताना भूक लागल्याने एके ठिकाणी सर्वांनी अंडा भुर्जीचा आस्वाद घेतला.यावेळी अंडा भुर्जी बनवतानाचं त्या युवाचं स्कील पाहून मलाही अंडा-भुर्जी बनवण्याचा मोह आवरला नाही.शेवटी त्याच्यासारखी भुर्जी मला बनवता आली नाही पण प्रयत्न केल्याचा आनंद मात्र मिळाला. pic.twitter.com/T93MXIFcu3
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 5, 2021
रोहित पवारांचा नवी मुंबई दौरा
रोहित पवार मंगळवारी (5 जानेवारी) रोहित पवार नवी मुंबईच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देण्यापूर्वी नवी मुंबईत अनेक ठिकाणी भेटी दिल्या. नागरीक, दुकानदार, विक्रेते यांच्याशी संवाद साधला. यावेळी नवी मुंबईकरांनी केलेल्या स्वागत सत्काराने भारावून गेल्याची भावना रोहित पवारांनी व्यक्त केली.
“वाशी कृ.उ.बाजार समितीला भेट देण्यापूर्वी नवी मुंबईत अनेक ठिकाणी नागरीक, दुकानदार, विक्रेते यांच्याशी संवाद साधला. यावेळी सर्वांचंच खूप प्रेम मिळालं. त्यांनी आग्रहाने कलींगड, ज्यूस, चहा दिला. काहींनी बाजारातच फेटा बांधून सन्मानही केला. नवी मुंबईकरांच्या या स्वागताने भारावून गेलो”, असं ट्वीट त्यांनी केलं.
वाशी कृ.उ.बाजार समितीला भेट देण्यापूर्वी नवी मुंबईत अनेक ठिकाणी नागरीक, दुकानदार, विक्रेते यांच्याशी संवाद साधला. यावेळी सर्वांचंच खूप प्रेम मिळालं. त्यांनी आग्रहाने कलींगड, ज्यूस, चहा दिला. काहींनी बाजारातच फेटा बांधून सन्मानही केला. नवी मुंबईकरांच्या या स्वागताने भारावून गेलो. pic.twitter.com/r445ILFAyg
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 5, 2021
यावेळी रोहित पवारांनी नागरिकांशी अनेक विषयांवर चर्चा केली. नवी मुंबईत असलेली गावाकडील बरीच मंडळी भेटल्याने आनंद द्विगुणित झाला, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, तेजस शिंदे, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते (Rohit Pawar Cook Anda Bhurji).
#मविआ सरकारमधील पालकमंत्री व आरोग्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या काळात प्रशासक म्हणून उत्तम काम करणारे नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर साहेब यांची भेट घेतली.त्यांनी सुरू केलेल्या ‘डेथ ऑडिट’मुळं मृत्युदर कमी होण्यास कशी मदत झाली याची माहिती त्यांनी यावेळी दिली. pic.twitter.com/Bta7SXAQrn
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 5, 2021
तसेच, त्यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर साहेब यांचीही भेट घेतली. त्यांनी सुरु केलेल्या ‘डेथ ऑडिट’मुळे मृत्युदर कमी होण्यास कशी मदत झाली, याची माहिती रोहित पवारांनी जाणून घेतली (Rohit Pawar Cook Anda Bhurji)
संबंधित बातम्या :
रोहित पवारांचं थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र; म्हणतात…