राज ठाकरेंच्या भाषणावर कुणाचा प्रभाव, राष्ट्रवादीच्या आमदारांनी राज ठाकरेंना लगावला टोला
लोकांच्या हिताचे प्रश्न त्यांनी आपल्या भाषणात मांडावे, कुठलाही भेदभाव न करता राज ठाकरे यांनी आपले भाषण करावे, जनतेच्या हिताचे त्यांनी भाषण करावे असं राष्ट्रवादीचे आमदार म्हणाले आहे.
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणाचा मी चाहता आहे. त्यांचे भाषण मला भावते तसे सर्वसामान्य जनतेला देखील भावते. पण, नुकतेच त्यांचे जे भाषण झाले त्या भाषणात मध्ये-मध्ये भाजपचा प्रभाव दिसून येत होता, असा टोला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यांची मूळ शैली आहेत ती थोडी-थोडी दिसून येत होती, त्यामुळे त्यांनी पुढील काळात त्यांची मूळ शैलीच जोपासावी, लोकांच्या हिताचे प्रश्न त्यांनी आपल्या भाषणात मांडावे, कुठलाही भेदभाव न करता राज ठाकरे यांनी आपले भाषण करावे, जनतेच्या हिताचे त्यांनी भाषण करावे अशी अपेक्षाही रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. रोहित पवार नाशिक दौऱ्यावर आलेले असतांना माध्यमांशी बोलतांना हे मत मांडले आहे. राज ठाकरे यांनी नुकताच मुंबईत गटाध्यक्ष यांचा मेळावा घेतला होता. त्यादरम्यान राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यपाल यांच्यावर टीका केल्याचे दिसून आले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या भाषण शैलीने अनेकांना भावतात तसे मलाही भावतात असं राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी म्हंटलं आहे.
रोहित पवार यांनी यावेळी बोलतांना मात्र, राज ठाकरेंना टोला लगावला आहे, त्यांच्या भाषणावर भाजपचा प्रभाव दिसून आल्याचे म्हंटले आहे.
राज ठाकरे यांच्या भाषणाची मूळ शैली मध्येमध्येच दिसत होती, त्यामुळे त्यांनी पुढील काळात जनतेच्या हिताचे भाषण करावे कुठलाही भेदभाव करू नये अशी अपेक्षाही रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
नाशिक दौऱ्यावर आलेल्या रोहित पवार यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावरुन टोले लगावत असतांना राजकारणाची पातळी खालवत चालली असल्याचेही म्हंटले आहे.
याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यावेळी रोहित पवार यांनी टोले लगावले आहे, रोहित पवार म्हणेल मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये ज्योतिषाला हात दाखवल्याचे बोलले जाते. मला असे वाटते कुणी काय दाखवावे हा त्यांचा विषय आहे.
पण लोकहिताचे निर्णय आपल्याला घ्यावे लागतील. त्यामुळे हात दाखवण्यापेक्षा स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे, याशिवाय युवक काम मागत आहे ते काम त्यांनी द्यावे.