BIG BREAKING | जयंत पाटील यांच्या हातून राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद जाण्याचे संकेत?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली घडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा भाकरी फिरणार आहे. विशेष म्हणजे ही भाकरी प्रदेशाध्यक्ष पदाबाबत फिरण्याची शक्यता आहे. पुढच्या दोन महिन्यात याबाबत महत्त्वाच्या घडामोडी घडण्याचे संकेत आहेत.

BIG BREAKING | जयंत पाटील यांच्या हातून राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष पद जाण्याचे संकेत?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 6:53 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात सध्या प्रचंड घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादीचे नवनियुक्ती कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच काही दिवसांपूर्वी या दोन्ही नव्या कार्यकारी अध्यक्षांची नियुक्ती केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीत आता महाराष्ट्रातही मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये देखील चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची निवड होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लवकरच संघटनात्मक बदल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया दोन महिन्यात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रदेशाध्यक्ष पदासाठी बदल अपेक्षित असल्याची देखील चर्चा आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष बदलाची प्रक्रिया सुरु

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. स्थानिक पातळीवर पदाधिकारी बदलल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. पुढच्या दोन महिन्यात म्हणजेच ऑगस्टपर्यंत राष्ट्रवादीच्या नव्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीतील दोन बड्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठीची इच्छा व्यक्त करुन दाखवली आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अजित पवार यांचं महत्त्वाचं वक्तव्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतंच एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी आपल्याला विरोधी पक्षनेतेपदाच्या जबाबदारीपासून मुक्त करा. तसेच आपल्याला संघटनात्मक जबाबदारी द्या, अशी मागणी अजित पवार यांनी केली होती. यावेळी त्यांनी जयंत पाटील हे 5 वर्ष 2 महिन्यांपासून प्रदेशाध्यक्ष आहेत, असं म्हटलं होतं. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी तर हवी नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

छगन भुजबळ यांची ओबीसी नेत्याला प्रदेशाध्यक्ष पद देण्याची मागणी

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रदेशाध्यक्ष पदाबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. ओबीसी समाजाच्या नेत्याला प्रदेशाध्यक्ष पद द्यावं, असं ते म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त मराठ्यांचा पक्ष आहे, असं मत सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालाय. त्यामुळे इतक्या वर्षात फक्त 50-60 जागांवर आमदार निवडून येत आहेत. पक्षाने प्रदेशाध्यक्ष पदासाठी ओबीसी समाजाच्या नेत्याचा विचार केला तर चांगला फायदा होईल. भाजप पक्षही तशी रणनीती आखत आहे. मग आपल्याला करायला काय हरकत आहे, असं छगन भुजबळ म्हणाले होते.

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.