जयंत पाटील म्हणतात, त्यांच्यावर आताच कारवाई करा तर विधानसभा अध्यक्ष म्हणाले निर्णय घेणे…

जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिले होते. या पत्रावर अध्यक्ष यांनी निणर्य घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. जयंत पाटील यांच्या या मागणीवर विधानसभा अध्यक्ष यांनी एक महत्वाचे विधान केलंय.

जयंत पाटील म्हणतात, त्यांच्यावर आताच कारवाई करा तर विधानसभा अध्यक्ष म्हणाले निर्णय घेणे...
NCP MLA JAYANT PATIL AND SPEAKER RAHUL NARVEKARImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Jul 10, 2023 | 9:08 PM

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ९ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिले होते. या पत्रावर अध्यक्ष यांनी निणर्य घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे. जयंत पाटील यांच्या या मागणीवर विधानसभा अध्यक्ष यांनी एक महत्वाचे विधान केलंय. जयंत पाटील यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सध्या स्फुटणी सुरू असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले आहेत.

ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या याचिकेवर दिलेल्या निकालात सुप्रिम कोर्टाने व्हिपची नेमणूक करण्याचा अधिकार राजकीय पक्षाला आहे असे स्पष्टपणे सांगितले आहे. मात्र, इथे नेमका मुळ पक्ष कुणाचा आणि कोण रिप्रेझेंट करत आहे या विषयाची खात्री पटवून घेता येत नाही. याची खात्री पटल्यानंतर पुढची कारवाई करू. तोपर्यंत कुणी व्हीप बनावे यावर निर्णय घेणे अवघड असल्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले

हे सुद्धा वाचा

शिवसेनेच्या दोन्ही गटांना पुन्हा नोटीस

शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना त्यांची बाजू मांडण्यासाठी नोटीस पाठविण्यात आली होती. मात्र, काही जणांनी मुदतवाढ देण्याचौ मागणी केली होती. त्यामुळे त्या आमदारांना आपली बाजू मांडण्यासाठी परत एकदा नोटिसा पाठवल्या आहेत. त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी सात दिवसाची मुदत देण्यात आली आहे. पत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांना सात दिवसात आपला अभिप्राय कळवायचा आहे असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

व्हीप बजावण्याचा अधिकार कुणाला?

व्हीप बजावण्याचा अधिकार कुणाला आहे याचा निर्णय घेणे अवघड आहे. कारण, सुप्रीम कोर्ट असे म्हणाले आहे की व्हीपची नेमणूक करण्याचा अधिकार राजकीय पक्षाला आहे. त्यामुळे मूळ पक्ष कोणाचा याची जोपर्यंत खात्री होत नाही तोपर्यंत हा निर्णय घेणे कठीण आहे.

राष्ट्रवादीच्या आमदारांची आसन व्यवस्था कशी?

शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले आहेत. त्यामुळे विधानसभा सभागृहात शिवसेनेला जशी आसन व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे त्याचप्रमाणे राष्ट्रवादीच्या आमदारांनाही आसन व्यवस्था निर्माण करून देऊ. सभागृहातही आसन व्यवस्था कशी असावी याचा निर्णय अध्यक्ष घेत असतात आणि त्याबाबत योग्य निर्णय घेऊ असे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....