चिंचवडची निवडणूक तिरंगी, पण… अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर शरद पवार स्पष्टच बोलले…

चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होईल अशी चर्चा असतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देऊन या चर्चेचा फुगा फोडला आहे.

चिंचवडची निवडणूक तिरंगी, पण... अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यावर शरद पवार स्पष्टच बोलले...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 4:02 PM

पुणे : चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शरद पवार ( Sharad Pawar ) स्वतः प्रचारासाठी मैदानात उतरले आहे. यावेळी शरद पवार यांनी मध्यमांशी संवाद साधत असतांना चिंचवड निवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे ( Rahul Kalate ) यांच्याबाबत मौन सोडलं आहे. राहुल कलाटे यांच्याबद्दल सुरुवातीला जी चर्चा झाली तीची हाइट होती मात्र नंतर चर्चा कमी कमी होत गेली. इतक्या वर्षांचा अनुभव पाहता त्यांना फार मते मिळणार नाही. खरी लढत ही भाजप आणि महाविकास आघाडीमध्येच होईल असे शरद पवार यांनी म्हंटलं आहे.

चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्यानंतर होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत आहे.

याच दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंचवडमध्ये काय चित्र असणार हे स्पष्ट करत राहुल कलाटे यांचा पराभव निश्चित असल्याचे म्हंटले आहे. यावेळी शरद पवार यांनी राजकीय अनुभव सांगत चिंचवडमध्ये कोण बाजी मारणार यावर भाष्य केलं आहे.

हे सुद्धा वाचा

चिंचवड निवडणुकीत राहुल कलाटे हे शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक होते. त्यानंतर राहुल कलाटे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनही इच्छा व्यक्त केली होती. त्यावरही शरद पवार यांनी भाष्य करत या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

चिंचवड पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होईल अशी चर्चा असतांना शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देऊन या चर्चेचा फुगा फोडला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांची पुत्र आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांनी याठिकाणी कार्यक्रम हाती घेतल्याचे म्हंटले आहे.

माघारीच्या दिवशी राहुल कलाटे यांनी माघार घ्यावी यासाठी उद्धव ठाकरे यांनी सचिन अहिर यांना मनधरणी करण्यासाठी पाठविले होते, अजित पवार यांच्याकडूनही काही आमदारांना कलाटे यांनी माघार घेण्यासाठी विनंती करायला पाठविले होते.

त्यावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये शरद पवार म्हणाले नाना काटे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार आहे. त्यामध्ये 50 – 60 वर्षाचा अनुभव सांगत अपक्ष उमेदवाराला मतदान होत नसल्याचा दावा केला आहे.

मतदानाला चार दिवस बाकी असतांना शरद पवार यांनी प्रचारसभा घेतली आहे. त्यामध्ये शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल करत असतांना विकासाच्या मुद्द्यावर भाजप बोलत नाही म्हणत तूफान टोलेबाजी देखील केलीय.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.