Sharad Pawar: शिवसेना संपली का? शरद पवारांनी त्यांचा प्रसंग सांगितला जेव्हा त्यांच्यासोबत फक्त 5 आमदार राहिले

बंड होत असतात. यापूर्वी भुजबळांनी बंड केलं. आमच्या पक्षात आले. काही झालं नाही. त्यानंतर निवडणुकीत एक सोडून भुजबळांसह सर्व पडले. त्यानंतर राणेंनी बंड केलं. तेही पराभूत झाले. साधारण शिवसेनेत असं आज झालं नाही. ज्यांनी बंड केलं, त्याबद्दल शिवसैनिकांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे संघटना अशी बंद पडत नसते, असे पवारांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar: शिवसेना संपली का? शरद पवारांनी त्यांचा प्रसंग सांगितला जेव्हा त्यांच्यासोबत फक्त 5 आमदार राहिले
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 01, 2022 | 12:00 AM

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेतील बंडखोरी (Rebellion)बाबत वक्तव्य केले. पत्रकारांनी पवारांना शिवसेना (Shivsena) संपली का ? असा प्रश्न विचारला. यावर शरद पवारांनी बंडखोरीचे जुने प्रसंग सांगत याला उत्तर दिले. शिवसेना संपुष्टात आली नाही, येणार नाही. बंड होत असतात. यापूर्वी भुजबळांनी बंड केलं. आमच्या पक्षात आले. काही झालं नाही. त्यानंतर निवडणुकीत एक सोडून भुजबळांसह सर्व पडले. त्यानंतर राणेंनी बंड केलं. तेही पराभूत झाले. साधारण शिवसेनेत असं आज झालं नाही. ज्यांनी बंड केलं, त्याबद्दल शिवसैनिकांनी वेगळी भूमिका घेतली. त्यामुळे संघटना अशी बंद पडत नसते, असे पवारांनी स्पष्ट केले.

मी पाच लोकांचा नेता राहिलो

वर्ष 1981 मध्ये माझ्या नेतृत्वात 67 आमदार निवडून आले. सहा महिन्यांनी निवडणूक झाल्यावर मी सुट्टीला गेलो होतो. दहा दिवसांनी परत आलो. त्यावेळी माझ्यासह सहा लोक राहिले. मी 67 आमदारांचा विरोधी पक्षनेता होतो. मी पाच लोकांचा नेता राहिलो. माझं पदही गेलं. पण त्यानंतर निवडणूक झाली. मला सोडून गेलेल्या सर्वांचा पराभव झाला आणि माझी टीम 73 झाली, याची आठवणही पवारांनी करुन दिली. ठाकरेंवर संकट असलं तरी उद्या जेव्हा ते लोकांमध्ये जातील आणि लोकांना मतदानाची संधी मिळेल तेव्हा चित्रं वेगळं दिसेल. अदृश्य शक्ती प्रामाणिकपणे काम करत असेल. विमानं तयार असतात, हॉटेल असतात. काही प्रभावी लोक असतात, असेही पवार पुढे म्हणाले.

शिंदे प्रभावी ठरले

आम्ही कमी पडलो नाही. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या लोकांना बाहेर न्यायला प्रभावी ठरले. त्याचा मूळ इफेक्ट म्हणून 38 आमदार बाहेर जातात. ही काही साधी गोष्ट नाही. ती नेण्यासाठी कुवत शिंदेंनी दाखवली. त्यातच त्यांचं यश आहे, असे पवारांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा

देवेंद्र यांची स्वीकृती मला आश्चर्यकारक वाटली नाही

एकदा मुख्यमंत्री पदावर गेल्यानंतर त्याच यंत्रणेची पदे स्वीकारण्याची उदाहरणे महाराष्ट्रात यापूर्वी होती. माझ्या मंत्रिमंडळात शंकरराव चव्हाण अर्थमंत्री होते. शंकरराव चव्हाणांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. पण जेव्हा मी मुख्यमंत्री झालो. तेव्हा शंकररावजी माझ्या मंत्रिमंडळात जॉईन झाले. शंकररावजी नंतर शिवाजीराव निलंगेकर मुख्यमंत्री होते. नंतर ते मंत्री झाले. त्यानंतर अशोकराव चव्हाण सध्याचे मंत्री, तेही मुख्यमंत्री होते. ते मंत्री झाले. त्यामुळे अशी उदाहरणं महाराष्ट्रात घडली आहे. त्यामुळे देवेंद्र यांची स्वीकृती मला आश्चर्यकारक वाटली नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. (NCP president Sharad Pawar told the story of rebel MLAs in his government)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.