कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे… शरद पवार यांची अमित शाह यांच्यावर सडकून टीका, तडीपार म्हणूनही उल्लेख
बाबूभाई म्हणून गुजरातचे कर्तबगार प्रामाणिक आणि स्वच्छ मुख्यमंत्री होते. त्यानंतर माधवराव सोलंकी आणि चिमणभाई पटेल आदी उत्तम प्रशासक होते. ही नावं सांगितली यांचं वैशिष्ट्ये म्हणजे त्यापैकी कुणालाही त्यांच्या राज्यातून तडीपार करण्यात आलं नाही, अशा शब्दात शरद पवारांनी घणाघात केला.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेच्या अनेक घटना होत आहेत. आता यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली आहे. यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण हे देशाचं गृहमंत्री होते. या पदाची गरीमा आणि प्रतिष्ठा या देशभक्तांनी ठेवली. बाबूभाई म्हणून गुजरातचे कर्तबगार प्रामाणिक आणि स्वच्छ मुख्यमंत्री होते. त्यानंतर माधवराव सोलंकी आणि चिमणभाई पटेल आदी उत्तम प्रशासक होते. ही नावं सांगितली यांचं वैशिष्ट्ये म्हणजे त्यापैकी कुणालाही त्यांच्या राज्यातून तडीपार करण्यात आलं नाही, अशा शब्दात शरद पवारांनी घणाघात केला.
शरद पवारांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी विविध मुद्द्यांवर हल्लाबोल केला. “आजचा दिवस संक्रातीचा आहे. तुम्हाला संक्रातीच्या शुभेच्छा. तुमच्या सर्वांच्या हातात लेखणी असते. त्यामुळे रोज तुम्हाला सांगायची गरज नाही. फक्त तुमची लेखणी आमच्यासाठी ठेवा एवढंच सांगायचं आहे”, असे शरद पवार म्हणाले.
“गुजरातनेही अत्यंत उत्तम प्रकारची ओळख देशाला करून दिली”
“या देशाच्या स्वातंत्र्यानंतर काही कर्तृत्वान व्यक्ती, स्वातंत्र्यानंतर अत्यंत प्रभावी आणि सर्व देशाचं राज्यांना एकत्रित करण्याचं काम सरदार पटेल यांनी केलं. स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशात पंडित गोविंद वल्लभ पंत यांनी देशाचं गृहमंत्री म्हणून सर्वांनी अनुभवलं. महाराष्ट्राचं योगदान होतं. यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण हे देशाचं गृहमंत्री होते. या पदाची गरीमा आणि प्रतिष्ठा या देशभक्तांनी ठेवली. आपलं शेजारचं गुजरात हे महाराष्ट्र हे एक राज्य होतं. गुजरातनेही अत्यंत उत्तम प्रकारची ओळख देशाला करून दिली”, असे शरद पवारांनी म्हटले.
“कुणालाही त्यांच्या राज्यातून तडीपार करण्यात आलं नाही”
“बाबूभाई म्हणून गुजरातचे कर्तबगार प्रामाणिक आणि स्वच्छ मुख्यमंत्री होते. त्यानंतर माधवराव सोलंकी आणि चिमणभाई पटेल आदी उत्तम प्रशासक होते. ही नावं सांगितली यांचं वैशिष्ट्ये म्हणजे त्यापैकी कुणालाही त्यांच्या राज्यातून तडीपार करण्यात आलं नाही. तो प्रसंग राज्यकर्त्यांवर आला नाही. तडीपार न केलेले आणि गृहखातं सांभाळून देशाला योगदान देणारे हे नेते होते. पण थोडी बहूत माहिती घेऊन भाष्य केलं तर लोकांच्या मनात शंका येणार नाही”, असेही शरद पवार म्हणाले.
“जनसंघाची पार्श्वभूमी असलेल्यांनी माझ्यासोबत काम केलं”
“त्यांना १९७८ सालापासून त्यांना माझी माहिती झाली. १९५८ सालापासून मी राजकारणात काय केलं त्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यांना माहीत नसेल ७८ साली हे व्यक्ती कुठे होते राजकारणात मला माहीत नाही. पण ७८ साली मी मुख्यमंत्री होतो. त्यात जनसंघाचे नेते उत्तमराव पाटील, हशू अडवाणी, प्रमिलाताई आदी कर्तृत्वान लोक, जनसंघाचे लोक माझ्या मंत्रिमंडळात होते. पुलोद सरकारची माहिती घेतली तर यातील सगळ्यांनी राज्यासाठी चांगलं योगदान दिलं. म्हणून मी मुख्यमंत्री असताना उत्तमराव पाटील गृहमंत्री उपमुख्यमंत्री होते. आणि आडवाणी नगरविकास खात्याचे होते. जनसंघाची पार्श्वभूमी असलेल्यांनी माझ्यासोबत काम केलं. संघात राहून आम्हाला सहकार्य केलं त्यापैकी वसंतराव भागवत आणि प्रमोद महाजन होते. ही सर्व नेतृत्वाची फळी भाजपने ७८नंतर दिली. नंतरच्या काळात देशात पक्ष वेगवेगळी सत्तेत होती. पण राजकीय पक्षातील नेत्यात सुसंवाद होता. उदाहरणच द्यायचं तर वाजपेयी आणि आडवाणी यांचं नाव घेतलं पाहिजे. हे कर्तृत्ववान लोक होते. ते अतिरेकी भूमिका घेऊन समाजकारण किंवा राजकारण केलं नाही”, असेही शरद पवारांनी सांगितले.
“उदाहरण सांगायचं म्हणजे भूजला भूकंप झाला. मुख्यमंत्र्यांची बैठक पंतप्रधानांनी बोलावली. त्यात एक प्रश्न निर्माण झाला. ही संकटे येत आहेत. अतिवृष्टी आणि महापूर, भूकंपाचं धोरण ठरवलं पाहिजे. त्यासाठी वाजपेयी यांनी ती जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी विरोधी पक्षात असताना मंत्र्याचा दर्जा देऊन ते काम माझ्याकडे सुपूर्द केलं. ही पार्श्वभूमी भाजपच्या नेत्याकडे आहे. पण हल्लीच्या गृहमंत्र्यांनी जे भाषण केलं. मी आणि उद्धव ठाकरेंवर जे भाष्य केलं त्यावर न बोललं बरं. मराठीत एक म्हण आहे कुठे कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी अशी म्हण आहे”, असे शरद पवार म्हणाले.