अखेर साताऱ्याचा तिढा सुटला, पृथ्वीराज बाबा नाहीच, शरद पवार गटाचा उमेदवार कोण?
लोकसभा निवडणुका आता अगदीच जवळ आल्या आहेत. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या साताऱ्याच्या जागेचा सस्पेन्स आता संपला आहे. महाविकास आघाडीकडून साताऱ्याच्या उमेदवाराचं नाव जाहीर झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.
लोकसभा निवडणुका आता अगदीच जवळ आल्या आहेत. संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या साताऱ्याच्या जागेचा सस्पेन्स आता संपला आहे. महाविकास आघाडीकडून साताऱ्याच्या उमेदवाराचं नाव जाहीर झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आता शशिकांत शिदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
लढवण्यास नकार दिला होता. तेव्हापासून मविआचा साताऱ्यातील उमेदवार कोण याबाबत चर्चा सुरू होती. मध्यंतरी या जागेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नावही चर्चेत आलं होतं. मात्र आता साताऱ्याच्या जागेचा सस्पेन्स संपला असून शशिकांत शिंदे हे साताऱ्यातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना लोकसभेसाठी तिकीट देण्यात आलं आहे. त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता.
महायुतीकडून उमेदवाराच्या नावीच आज होणार घोषणा ?
महायुतीने अद्याप साताऱ्यासाठी उमेदवाराचे नाव जाहीर केलेलं नाही पण उदयनराजे यांनाच इथली उमदेवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. आज भाजपची ९वी यादी जाहीर होणार असून त्यामध्ये साताऱ्याचा उमदेवारही जाहीर होऊ शकतो. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील उमेदवारांच्या नावांची आज घोषणा होऊ शकते. त्यामध्ये साताऱ्यासाठी उदयनराजेंचं नाव जाहीर होणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल. महायुतीने उदयनराजेंना लोकसभेसाठी तिकीट दिल्यास साताऱ्यामध्ये मविआचे शशिकांत शिंदे वि. महायुतीचे उदयनराजे भोसले असा सामना रंगू शकतो.
ट्विटरवरून नाव केलं जाहीर
तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबतीने सेवा-सन्मान आणि स्वाभिमानी विचारांचा वारसा प्रखर करूया! असं ट्विट अधिकृत अकाऊंट वरून करण्यात आलं आहे.
तुतारीच्या साथीने महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत अधिक बुलंद करण्यासाठी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. चला, आदरणीय खा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबतीने सेवा-सन्मान आणि… pic.twitter.com/XUHuXOh88P
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 10, 2024
पृथ्वीराज चव्हाण यांचा नाव होतं चर्चेत
शरद पवार गटाने बराच काळ साताऱ्यातील उमेदवार जाहीर केलेला नव्हता.श्रीनिवास पाटील यांनी लढण्यास नकार दिल्यानंतर साताऱ्यातील पेच निर्माण झाला होता. साताऱ्यासाठी शरद पवार गटातून तीन उमेदवार इच्छुक होते. मात्र, ही जागा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना सोडण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा होती. स्वत: पृथ्वीराज चव्हाण यांनीही साताऱ्यातून लढण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे साताऱ्याच्या जागेकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. पण आता पृथ्वीराज चव्हाण यांचा पत्ता कट झाला असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.